agriculture news in Marathi, agrowon, Allow GM seed tests | Agrowon

जीएम बियाणे चाचण्यांना परवानगी द्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

परभणी (प्रतिनिधी)ः जनुकीयरित्या परावर्तित (जीएम) विविध पिकांच्या बियाणे चाचण्यांसाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले.

परभणी (प्रतिनिधी)ः जनुकीयरित्या परावर्तित (जीएम) विविध पिकांच्या बियाणे चाचण्यांसाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले.

अनेक देशांतील शेतकरी जिनेटीकली माॅडीफाइड पिकांची लागवड करून फवारणी; तसेच आंतरमशागतीवरील खर्च कमी करून चौपट उत्पादन घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कपाशीचे बीजी १, बीजी २ वाण बोंड अळीला रोखू शकत नाहीत. जगातील अनेक देश सोयाबीन, हरभरा, मका, मोहरी, वांगे आदी पिकांच्या जीएम वाणांची लागवड करून उत्पादन घेत आहेत. कीड, रोग, तणप्रतिबंधक आदी एकूण ७ प्रकारच्या घटकांसाठी विकसित केलेले जीएम बियाणे वापरले जात आहे.

भारतीय शेतकरी मात्र या तंत्रज्ञानापासून वंचित राहत आहेत. २०१४ मध्ये जनुकीय परावर्तित मकाच्या चाचण्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे इतर पिकांच्या जी. एम. वाणांच्या चाचण्यांसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष भास्कर खटिंग, किशोर ढगे, केशव आरमळ, डिंगाबर पवार, शेख जाफर, माउली कदम, सय्यद कलिम, आदींनी मागणी केली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...