agriculture news in Marathi, agrowon, Angeangaosuri market committee corruption | Agrowon

अंजनगावसुर्जी बाजार समितीत तुरीची हेराफेरी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018

अमरावती  ः सॅम्पलच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मालातील एक ते दोन किलो तूर काढत घरी नेण्याचा धक्‍कादायक प्रकार अंजनगावसुर्जी बाजार समितीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाजार समिती सचिव, खरेदी विक्री व्यवस्थापकासह ग्रेडर विरोधात गुन्हा दाखल केला.

अमरावती  ः सॅम्पलच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मालातील एक ते दोन किलो तूर काढत घरी नेण्याचा धक्‍कादायक प्रकार अंजनगावसुर्जी बाजार समितीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाजार समिती सचिव, खरेदी विक्री व्यवस्थापकासह ग्रेडर विरोधात गुन्हा दाखल केला.

अंजनगावसुर्जी बाजार समितीत प्रशांत सुरेश बहाकर नामक ग्रेडर शेतकऱ्यांच्या तुरीची प्रतवारी (सॅम्पल) तपासण्याच्या नावाखाली एक ते दोन किलो तूर काढून घेत होता. हा गैरप्रकार करण्यासाठी ग्रेडरला खरेदी विक्रीचे व्यवस्थापक मधुकर बोंद्रे व बाजार समिती सचिव गजानन नवघरे यांचे सहकार्य मिळत असल्याची बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. मात्र तक्रार केल्यास आपलीच तूर घेण्यासाठी नकार मिळेल, या भीतीपोटी कोणीही शेतकरी तक्रारीसाठी धजावत नव्हता. 

शेतकऱ्यांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत तिघांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या लुटीचे सत्र सुरूच ठेवले. दरम्यान याप्रकरणाची वाच्यता होऊ लागली. काही शेतकऱ्यांनी हा प्रकार उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांना कळविला. त्यांनी गुप्त पाळत ठेवली असता १५ मार्चला ग्रेडर बहाकार यास तुरीचे एक पोते नेताना पकडण्यात आले. त्यानंतर जवळपास १५ शेतकऱ्यांनी पोलिसांत याविषयीची तक्रार दिली. 

पोलिस चौकशीत आढळले तथ्य
ठाणेदार सुधीर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जमील शेख यांनी याप्रकरणी चौकशी केली. त्यात एखाद्या व्यक्‍तीने विश्‍वासाने दिलेल्या वस्तूचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने बाजार समिती सचिव, खरेदी विक्री व्यवस्थापक तसेच ग्रेडर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...