संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले

संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले

सोलापूर  : माढा तालुक्‍यतील सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या उन्हाळी हंगामातील पाणीवाटपाचे नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मोडनिंब व पिंपळनेर वितरिकेच्या लाभक्षेत्रातील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ९) दुपारी टेंभुर्णी येथील भीमा पाटबंधारे उपविभागीय कार्यालय व पाटबंधारे शाखा कार्यालयाला टाळे ठोकत शाखा अभियंता सी. डी. घंटे यांच्यासह सात-आठ कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडले होते.

माढा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते. सोमवारी दुपारी कार्यालयातील शाखा अभियंता सी. डी. घंटे यांच्यासह सात-आठ कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडले. दरम्यान, शाखा अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवरून घटनेची माहिती देऊन तिढा सोडविण्याची मागणी केली. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापुरात पालकमंत्री यांच्याबरोबर बैठकीमध्ये असल्याचे सांगत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. 

सायंकाळी उपविभागीय अभियंता प्रवीण चौधरी आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ए. पी. सोनेवार यांच्याबरोबर मोबाईलवर चर्चा केली. परंतु पाणी सोडण्याबाबत अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घ्यावा लागेल, असे कार्यकारी अभियंता सोनेवार यांनी सांगितले. त्यामुळे सायंकाळपर्यंत याबद्दल ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com