agriculture news in Marathi, agrowon, angry pest surveyor strike in front of the commissioner | Agrowon

संतप्त कीड सर्वेक्षकांचे आयुक्तालयासमोर धरणे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे  : गैरव्यवहाराच्या आरोपात अडकलेल्या कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पातील सर्वेक्षकांनी गुरुवारी भर उन्हात कृषी आयुक्तालावर मोर्चा काढला. मात्र, निवेदन स्वीकारण्यास कोणाही पुढे न आल्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन सुरू केले. 
 

पुणे  : गैरव्यवहाराच्या आरोपात अडकलेल्या कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पातील सर्वेक्षकांनी गुरुवारी भर उन्हात कृषी आयुक्तालावर मोर्चा काढला. मात्र, निवेदन स्वीकारण्यास कोणाही पुढे न आल्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन सुरू केले. 
 

क्रॉपसॅपमधील बहुतेक सर्वेक्षक हे शेतकरी कुटुंबांतील बेरोजगार युवक आहेत. अधिकाऱ्यांच्या संगनमताने गेल्या काही वर्षांपासून क्रॉपसॅपमधील ठेकेदार या सर्वेक्षकांचे आर्थिक शोषण करीत आहेत. या सर्वेक्षकांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या रकमा ठेकेदारांकडून परस्पर वापरल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही. 

महाराष्ट्र राज्य तांत्रिक कीडरोग सर्वेक्षक संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव शेंडगे म्हणाले, की २००९ पासून आम्ही राज्यातील सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, भात व फळपिकांच्या सर्वेक्षणाचे कष्टपूर्वक काम करतो आहे. आमच्यामुळे राज्याला ई गव्हर्नन्सचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आम्हाला कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले असून, ठेकेदार आमची लूट करीत आहेत. कृषी आयुक्तालयदेखील ही उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. 

दरम्यान, दुपारी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांची आस्थेने चौकशी केली. "कीड सर्वेक्षकांना कामावरून काढले जाणार नाही. तुम्ही शासनाकडे तुमच्या मागण्या मांडाव्यात. आम्हीदेखील तुमच्या समस्या शासनाकडे पाठवू," असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यामुळे कीड सर्वेक्षकांनी आंदोलन मागे घेतले.

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...