agriculture news in Marathi, agrowon, animal counting issue solve | Agrowon

पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी प्रश्‍न निकाली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या चढ्या दराने टॅब खरेदीचा प्रश्‍न निकाली निघाल्याने पशुगणनेसाठीची टॅब खरेदी सुलभ झाली आहे. यामुळे लवकरच टॅब खरेदी हाेऊन रखडलेली २० व्या पशुगणनेला प्रारंभ हाेण्याचा विश्‍वास पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून व्यक्त हाेत आहे. गेल्या वर्षी जुलै ते आॅक्टाेबरदरम्यान हाेणारी पशुगणना टॅबअभावी रखडली हाेती.

पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या चढ्या दराने टॅब खरेदीचा प्रश्‍न निकाली निघाल्याने पशुगणनेसाठीची टॅब खरेदी सुलभ झाली आहे. यामुळे लवकरच टॅब खरेदी हाेऊन रखडलेली २० व्या पशुगणनेला प्रारंभ हाेण्याचा विश्‍वास पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून व्यक्त हाेत आहे. गेल्या वर्षी जुलै ते आॅक्टाेबरदरम्यान हाेणारी पशुगणना टॅबअभावी रखडली हाेती.

केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले हाेते. मात्र, टॅब खरेदी दरातील गाेंधळ आणि माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडूनच टॅब खरेदीच्या अध्यादेशामुळे टॅब खरेदी रखडली हाेती. खुल्या बाजारात ५ हजार ३०० रुपये किमतीच्या टॅबची किंमत महाराष्ट्र आयटी महामंडळाने ११ हजार रुपये सांगितल्याने टॅब खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाला हाेता. यामुळे आॅक्टाेबरअखेर हाेणारी पशुगणना अद्याप हाेऊ शकलेली नाही.

केंद्र शासनाने ‘इनाफ’ याेजनेअंतर्गत यंदाची २० वी पशुगणना टॅबद्वारे करण्याचा निर्णय देशपातळीवर घेतला. यासाठी केंद्र सरकार टॅब उपलब्ध करून देणार हाेते; मात्र नंतर राज्यांनी टॅब खरेदी करण्याचे सांगण्यात आले. टॅब खरेदीसाठी केंद्र शासन ६० टक्के निधी देणार हाेते. राज्याने ४० टक्के रक्कम द्यायची, असे ठरले हाेते. केंद्राने टॅब खरेदी करताना सहा हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेतील खरेदीसाठी परवानगी दिली.

महाराष्ट्राला ७ हजार २०० टॅबची आवश्‍यकता हाेती. यासाठीची प्रक्रिया पशुसंवर्धन विभागाने सुरू केली; मात्र एेन खरेदीच्या टप्प्यातच राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातूनच खरेदी करण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाने महामंडळाकडे मागणी नाेंदविल्यानंतर महामंडळाने याच टॅबची रक्कम ११ हजार रुपये सांगितल्याने अडचण निर्माण झाली. हेच टॅब मध्य प्रदेश सरकारने पाच हजार तीनेशे रुपये दराने खरेदी केले. यामुळे टॅब खरेदीमध्ये सावळा गाेंधळ निर्माण झाला हाेता. 

'आयटी'कडूनच टॅब खरेदीचा अध्यादेश रद्द
टॅब उपलब्धततेसाठी पशुसंवर्धन विभागाने उद्याेगांच्या सामाजिक दाियत्व याेजनेतून (सीएसआर) नाशिक येथील एका उद्याेगाकडेदेखील प्रयत्न केले हाेते. मात्र, उद्याेगाच्या कार्यक्षेत्रातच टॅबचा वापर व्हावा या अटीमुळे टॅब उपलब्ध हाेऊ शकलेले नाहीत. दरम्यान, आयटी महामंडळाकडूनच टॅब खरेदीचा अध्यादेश रद्द करण्यात आल्याने आता टॅब खरेदी हाेऊन २० व्या रखडलेल्या पशुगणनेला महिनाभरात प्रारंभ हाेईल, असा विश्‍वास पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून व्यक्त हाेत आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...