agriculture news in Marathi, agrowon, Animal Medical headquarters of the corporation | Agrowon

पशुधन महामंडळाच्या मुख्यालयाचे स्थलांतर चिघळणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 एप्रिल 2018

अकोला  ः सध्या अकोल्यात असलेले महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाचे राज्याचे मुख्यालय अकोल्यातून नागपूर किंवा पुणे येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर हे कार्यालय अकोल्यातून दुसरीकडे कुठेही हलविण्यास विविध संघटनांनी विरोध सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (ता. १६) काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिय्या दिला. यानंतर आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देत कार्यालय हटवू देणार नसल्याची भूमिका जाहीर केली.

अकोला  ः सध्या अकोल्यात असलेले महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाचे राज्याचे मुख्यालय अकोल्यातून नागपूर किंवा पुणे येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर हे कार्यालय अकोल्यातून दुसरीकडे कुठेही हलविण्यास विविध संघटनांनी विरोध सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (ता. १६) काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिय्या दिला. यानंतर आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देत कार्यालय हटवू देणार नसल्याची भूमिका जाहीर केली.

अनेक वर्षांपासून अकोल्यात सुरू असलेले महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाचा कारभार पुण्यातूनच अधिक चालविला जातो. येथे केवळ नावापुरतेच मुख्यालय ठेवण्यात आलेले असून, जाणीवपूर्वक कार्यालयाचा कारभार ढेपाळण्यात आल्याचा संशयसुद्धा वारंवार व्यक्त केल्या गेला. शिवाय हे कार्यालय सुरवातीला पुण्यात नेण्याबाबत हालचाली झाल्या होत्या. आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्रव्यवहारावरून हे कार्यालय नागपूर नेण्यासाठी जोरदार लॉबिंग केले जात आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यालयाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

एकूणच या घडामोडी पाहता आता स्थानिकांमधून विरोध सुरू झाला. भाजपच्या मंत्र्यांनी कार्यालय नागपुरात नेण्यावरून पत्रव्यवहार केला असल्याने स्थानिक भाजप नेतृत्वाची गोची झाल्याचेही दिसून येते. आता शिवसंग्राम संघटना, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय समाज पक्ष, समर्थ संघटना आदींनी स्थलांतराला विरोध दर्शवित सोमवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे आता राजकीय नेतृत्वांचा पेच होऊ लागला. शिवसंग्रामचे विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...