agriculture news in Marathi, agrowon, Apology for delay the Approval of Bladder Vaccine | Agrowon

लाळ्याखुरकत लसीकरण विलंबाबद्दल जाहीर माफी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई : राज्यात रखडलेल्या लाळ्याखुरकत लसीकरणावर पदूममंत्री महादेव जानकर यांच्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधकांनी विधानसभेत मंगळवारी (ता.६) सभात्याग केला. दरम्यान, ही लस रखडल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागून यात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. 

मुंबई : राज्यात रखडलेल्या लाळ्याखुरकत लसीकरणावर पदूममंत्री महादेव जानकर यांच्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधकांनी विधानसभेत मंगळवारी (ता.६) सभात्याग केला. दरम्यान, ही लस रखडल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागून यात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी पक्षांच्या आमदारांनी गेल्या आठवड्यात या संदर्भात लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवर मंगळवारी पुन्हा चर्चा घेण्यात आली. गेल्या चर्चेवेळी अनुपस्थित राहिलेले मंत्री जानकर मंगळवारी विधानसभेत आवर्जून उपस्थित होते. लसीकरणासाठी विलंब झाल्याबद्दल त्यांनी या वेळी राज्यातील शेतकऱ्यांची जाहीरपणे माफी मागितली. तसेच या लसखरेदीत गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले. 

ई-टेंडरिंगनुसार ही खरेदी प्रक्रिया होत असल्याने मंत्री फक्त दर ठरवतात, इतर प्रक्रिया तर आयुक्तालय स्तरावरून होते, असे सांगितले. त्यांनी या वेळी निविदा रद्द करण्यामागची तांत्रिक कारणेही स्पष्ट केली. देशात फक्त मे. इंडियन इम्युलॉजिकल्स कंपनी, बायोव्हेट प्रा.लि. आणि ब्रिलियन्स बायो फार्मा, बंगळूर या तीनच कंपन्या या लसीची निर्मिती करतात, असेही ते म्हणाले.

या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, की राज्यातील सुमारे २ कोटी १० लाख जनावरांचा लाळ्याखुरकुत रोगापासून बचाव व्हावा यासाठी दरवर्षी गाय, बैल, म्हशींना राज्य सरकारकडून लस देण्यात येते. जनावरांना वर्षातून दोनदा ही लस दिली जाते. मात्र, गेल्या वर्षभरापासून लसीकरणासाठी सात वेळा निविदा मागविण्यात आल्या. अजूनही लस जनावरांना मिळालेली नाही. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 

दरम्यान, सातव्या निविदेत पशुसंवर्धन विभागाने बायोव्हेट प्रा.लि. या कंपनीकडून ७ रुपये ७० पैसे दराने ही लस खरेदी केली. याच कंपनीने ही लस पंजाबमध्ये ६ रुपये २५ पैसे, पश्चिम बंगालमध्ये ६ रुपये ३३ पैसे दराने दिली आहे. मग राज्यात वाढीव दराने कंपनीला हे कंत्राट दिले हे स्पष्ट करावे, अशी मागणी करून त्यांनी लस रखडण्यामागे मंत्र्यांचे खासगी सचिव श्री. मुरकुटे, उपसचिव श्री. गुरव आणि उपायुक्त श्री. चव्हाण हे तिघेच या घोटाळ्याला कारणीभूत असल्याचा आरोप केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मे. इंडियन इम्युलॉजिकल्स कंपनी ही निमसरकारी कंपनी आहे. या कंपनीऐवजी दुसऱ्या खासगी कंपनीला हे कंत्राट का दिले हे सांगून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र, यासंदर्भात मंत्री श्री.जानकर यांनी कोणतीही ठोस घोषणा न केल्याने विरोधकांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवत सभात्याग केला. 
 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...