agriculture news in marathi, AGROWON app Wins Wan-ifra Award, Sakal, Pune, Maharashtra | Agrowon

‘ॲग्रोवन’ ॲप सर्वोत्तम !
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

हैदराबाद : ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप'साठीचा पुरस्कार मिळाला; तसेच डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये 'सकाळ माध्यम समूह' दक्षिण आशियात सलग दुसऱ्या वर्षी अग्रेसर ठरला आहे. 
 

हैदराबाद : ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप'साठीचा पुरस्कार मिळाला; तसेच डिजिटल माध्यमांमधील नव्या प्रवाहांमध्ये 'सकाळ माध्यम समूह' दक्षिण आशियात सलग दुसऱ्या वर्षी अग्रेसर ठरला आहे. 
 

‘ॲग्रोवन''च्या अनोख्या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे कृषी क्षेत्रातील घडामोडी, बाजारभाव, नवे प्रयोग, महत्त्वाच्या बातम्या अशी विविध प्रकारची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचते. ‘महाराष्ट्राच्या राजकारणाची बित्तंबातमी देणारे विश्वासार्ह संकेतस्थळ'' अशी www.sarkarnama.in ची अल्पावधीतच ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट छपाईसाठी ‘सकाळ''ला पुरस्कार मिळाला आहे. 

हैदराबादमध्ये सुरू असलेल्या ‘वॅन-इफ्रा इंडिया'' परिषदेत झालेल्या सोहळ्यात ‘वॅन-इफ्रा''चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट पेरेग्ने आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅनफ्रेड वेअरफेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘सकाळ माध्यम समूहा''चे संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, पुणे आवृत्तीचे मुख्य बातमीदार संभाजी पाटील, मुख्य आर्टिस्ट सुहास कद्रे, बाळासाहेब मुजुमले, जयेश गायकवाड, नीलम कामठे यांनी पुरस्कार स्वीकारले.

तिसऱ्यांदा मिळाला मान
जगभरातील उत्कृष्ट छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांच्या समूहात ‘सकाळ''चा समावेश झाला आहे. यापूर्वी दोन वेळा ‘सकाळ''ने हा पुरस्कार पटकावला आहे. जगभरातून २० देशांतील १२१ वृत्तपत्रांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. प्रादेशिक भाषेत ''सकाळ''ने हा मानाचा पुरस्कार मिळविला. तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये ‘सकाळ माध्यम समूह'' नेहमीच अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वॉलिटी क्‍लब २०१८ ते २०२० या वर्षासाठी २० देशांतील ६७ प्रकाशनांच्या ५४ वृत्तपत्रांनी हा मानाचा पुरस्कार मिळविला. या वृत्तपत्रांना आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर कलर क्वॉलिटी क्‍लबचे दोन वर्षांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.

''वृत्तपत्र व्यवसायामधील संपादकीय, तांत्रिक आणि व्यावसायिक विभागांमधील समन्वय'' या विषयावर ''वॅन इफ्रा''च्या परिषदेमध्ये गुरुवारी (ता.27) परिसंवाद झाला. या परिसंवादात ''सकाळ माध्यम समूहा''चे संचालक संपादक श्रीराम पवार, ''द हिंदू''चे संपादक मुकुंद पद्मनाभन, ''जागरण''चे कार्यकारी संचालक संदीप गुप्ता, ''हिंदुस्तान टाईम्स''चे कार्यकारी संचालक शरद सक्‍सेना सहभागी झाले होते. 

अॅग्रोवन अँड्रॉईड अॅपमध्ये शेती विषयक भरपूर माहिती...
▪अॅप आजच डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा...▪
https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.agrowon

Agrowon More Digital...
www.agrowon.com
www.facebook.com/AGROWON
www.Twitter.com/AGROWON

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...