प्रशासकीय अधिकाऱ्यांना दुग्ध व्यवसाय करायला सांगा

प्रशासकीय अधिकाऱ्यांना दुग्ध व्यवसाय करायला सांगा
प्रशासकीय अधिकाऱ्यांना दुग्ध व्यवसाय करायला सांगा

‘शेतीपूरक व्यवसाय करा त्यातून आर्थिक स्थैर्य मिळते, तंत्रज्ञानातून उत्पादकता वाढवा, असे सर्व सल्ले फक्‍त शेतकऱ्यांनाच दिले जातात. शासकीय अधिकाऱ्यांना मग सातवा वेतन आयोग का दिला जातो? दूध व्यवसाय जर इतकाच फायदेशीर आहे. तर मग जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यापर्यंत साऱ्यानाच हा व्यवसाय करायला सांगा. त्यामुळे सातवा वेतन आयोग देण्यासाठी निधीची गरजच पडणार आहे. दूध व्यवसायातून हे सारे अधिकारी आपला खर्च भागवतील आणि शासनावरदेखील अतिरिक्‍त निधीचा बोजा पडणार नाही. गौरक्षण संस्थांना जनावरे फुकट मिळतात. त्याच संस्थांना एक कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर भाकड गाईंसाठी शेतकऱ्यांना अनुदान का मिळू नये? एका शेतकऱ्याचे दोन तीन लाख रुपयांचे नुकसान भाकड जनावरांमुळे होते. याची भरपाई करण्यासाठी शासन का पुढे येत नाही. दुधाला भाव देत नसाल तर रोजगार हमी योजनेतून शेण काढणे व इतर कामे करण्याची परवानगी द्या. या विरोधात आम्ही आंदोलन करणार असून, एक जून रोजी तहसील कार्यालयासमोर भाकड जनावरे बांधून आंदोलन करून त्यानंतर पाच तारखेला शिवराज्याभिषेकांच्या पूर्वसंध्येला महादेव जानकर यांच्या घरासमोर दुग्धाभिषेक करण्याचे आंदोलन होईल.

- आमदार बच्चू कडू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com