agriculture news in Marathi, agrowon, Attention of sugar factories next season | Agrowon

कारखानदारांचे लक्ष आता पुढील हंगामावर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

कोल्हापूर : आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरल्याने केंद्राने ठरवून दिलेल्या साखर निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कारखान्यांना अपयश आले आहे. आता कारखान्यांनी पक्क्‍या साखरेची निर्यात करण्याऐवजी पुढील हंगामात पहिले दोन महिने कच्ची साखर निर्यात करण्याचा विचार सुरू केला आहे. बांगलादेश व चीन या देशांत कच्ची साखर निर्यात करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

कोल्हापूर : आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरल्याने केंद्राने ठरवून दिलेल्या साखर निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात कारखान्यांना अपयश आले आहे. आता कारखान्यांनी पक्क्‍या साखरेची निर्यात करण्याऐवजी पुढील हंगामात पहिले दोन महिने कच्ची साखर निर्यात करण्याचा विचार सुरू केला आहे. बांगलादेश व चीन या देशांत कच्ची साखर निर्यात करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

पुढील हंगामात पहिले दोन महिने पक्की साखर तयार न करण्याबाबतच्या हालचालीही कारखाना पातळीवरून सुरू आहेत. बंपर साखर उत्पादनाचा बोजा पुढील हंगामात पडू नये यासाठी कारखान्यांनी आता सगळे लक्ष पुढील हंगामावर केंद्रित केले आहे. केंद्राने कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान द्यावे यासाठी साखर उद्योगातून केंद्राकडे मागणी होत आहे.

यंदा राज्यातील १८७ कारखान्यांनी १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. गेल्या चार दिवसांत साखरेच्या दरात काहीशी वाढ झाली असली तरी शंभर-दीडशे रुपयांच्या वाढीने सगळी साखर विकणेही परवडणारे नसल्याने कारखान्यांनी वाढीव किंमत आली तरच साखर विक्रीला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय स्तरावरून बफर स्टॉक व साखरेच्या किमान विक्री दराचा प्रस्ताव खाद्य मंत्रालयाकडून सादर झाला असला तरी अजून तो मान्य झालेला नाही. तो मान्य होऊन त्याची कार्यवाही होइपर्यंत पुढील वर्षाचा हंगाम तोंडावर येणार आहे. 

लक्ष पुढील हंगामावरच 
अनेक कारखान्यांनी आता लक्ष पुढील हंगामावरच केंद्रित करण्याचे ठरविल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. राज्यातील कारखाने हंगाम सुरू झाल्यानंतर कच्ची साखर तयार करतात. नंतर पक्की साखर तयार करण्याकडेच कल रहातो. पण येणाऱ्या हंगामात पक्की साखर तयार करणे नुकसानीचे ठरणार असल्याने कारखानदारांनी कच्ची साखर उत्पादित करून पहिले दोन महिने तरी कच्ची साखरच निर्यात करावी यासाठी निर्यातीसाठी योग्य शेजारील देशांचा कानोसा घ्यावा, असा सूर साखर उद्योगातून आहे. साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनाही कच्या साखरेच्या निर्यातीस अनुकूल असल्याने याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

केंद्राने या निर्यातीसाठी जर काही प्रोत्साहात्मक अनुदान देण्याचे ठरविल्यास कारखाने कच्या साखरेच्या निर्मितीस प्राधान्य देऊन ती साखर निर्यात करण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे पहिले दोन महिने तरी पक्की साखर तयार होणार नाही. पक्‍या साखरेची निर्मिती होणार नाही या शक्‍यतेने देशंतर्गत बाजारात साखरेचे दर वाढल्यास या कालावधीत साखरेची विक्रीही वाढू शकेल. 

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...