agriculture news in Marathi, agrowon, Auction closed in Chopra Market Committee | Agrowon

चोपडा बाजार समितीत लिलाव बंद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

जळगाव  ः शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजार समितीमधील अडतदारांवर हमीभावापेक्षा कमी दरात धान्याची खरेदी केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १६) चोपडा (जि. जळगाव) येथील अडतदारांनी लिलाव बंद ठेवले. 

जळगाव  ः शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजार समितीमधील अडतदारांवर हमीभावापेक्षा कमी दरात धान्याची खरेदी केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १६) चोपडा (जि. जळगाव) येथील अडतदारांनी लिलाव बंद ठेवले. 

चोपडा येथे एकाही शेतकऱ्याची तक्रार नसताना व सद्यःस्थितीत हरभरा, दादरची आवक अधिक असताना अडतदारांनी बंद पाळणे म्हणजे शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याची नाराजी शेतकरी कृती समितीने व्यक्त केली आहे. चोपडा बाजार समितीमध्ये प्रमुख १० अडतदार धान्याची खरेदी करतात. परंतु ही खरेदी सोमवारी बंद राहील्याने लिलावही झाले नाहीत. शेतकऱ्यांचा शेतीमाल किंवा धान्य तसेच पडून राहिले. तर काही शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणलाच नाही. 

कृती समितीची पदाधिकाऱ्यांशी चर्चा अडतदारांनी बंदची पूर्वसूचना दिल्यानंतर शेतकरी कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील व इतरांनी रविवारी (ता. १५) बाजार समितीचे सभापती जगन्नाथ पाटील व उपसभापती नंदकिशोर पाटील यांच्याशी चर्चा केली. अडतदारांनी बंद केला तर शेतीमालाची आवक रखडेल. शेतकरी किती दिवस घरी शेतमाल किंवा धान्य साठवू शकतात. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. बाजार समितीमधील लिलाव बंद राहिले तर शेतकरी अडचणीत येतील. बंद मागे घेतला जावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

अडतदारांना भीती
शहादा बाजार समितीत ज्या शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात हरभरा व इतर धान्याची खरेदी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. सध्या हरभरा व इतर धान्याला राष्ट्रीय बाजारात उठाव कमी असल्याने दरांवर दबाव आहे. अडतदार हमीभावात खरेदी करू शकत नाहीत, अशा स्थितीत कुणी तक्रार केली तर अडतदारच अडचणीत येतील, अशी भूमिका अडतदारांनी मांडल्याची माहिती मिळाली.

शेतकऱ्यांशीही चर्चा
शेतकरी कृती समिती व इतर शेतकऱ्यांनी अडतदारांनी बंद पुकारणे म्हणजे शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याची नाराजी बाजार समिती पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्यानंतर अडत असोसिएशनचे अध्यक्ष सुनील जैन यांनी कृती समितीचे एस. बी. पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून चर्चा केली. आपला बंद हा लवकरच मागे घेतला जाईल, शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा मुद्दाच नाही, अशी भूमिका जैन यांनी मांडल्याची माहिती एस. बी. पाटील यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...