ॲग्रोवन स्मार्ट ॲवार्डसचे पुण्यात उद्या वितरण

ॲग्रोवन स्मार्ट ॲवार्डसचे पुण्यात उद्या वितरण
ॲग्रोवन स्मार्ट ॲवार्डसचे पुण्यात उद्या वितरण

पुणे : मातीला श्रमाच्या सुगंधाची जोड देऊन कर्तृत्वाचा मळा फुलवणाऱ्या महाराष्ट्रातील बहाद्दर शेतकऱ्यांचा शुक्रवारी (29 डिसेंबर) ॲग्रोवन स्मार्ट ॲवार्डस देऊन गौरव करण्यात येणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात विविध वर्गवारीत निवडण्यात आलेल्या 11 शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात दुपारी 4 वाजता आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यात "ॲग्रोवनच्या'वतीने स्मार्ट शेतकऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली जाईल.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जावी आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने हे पुरस्कार दिले जातात. या उपक्रमासाठी सोनाई कॅटल फिड्‌स, यूपीएल, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि, स्मार्टकेम फर्टिलायझर्स लि., बॅंक ऑफ महाराष्ट्र, ओरिएंटल इन्शुरन्स, चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

राज्यस्तरीय सहा व विभागीय पाच अशा एकूण अकरा गटांमध्ये हे पुरस्कार दिले जातील. पुरस्कारांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला. त्रयस्थ निवड समितीने त्यातून अकरा विजेत्यांची निवड केली आहे. यापैकी 10 पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय ‘ॲग्रोवन'मधून आजअखेर करून दिला आहे. ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या मुख्य पुरस्काराची घोषणा मात्र 29 डिसेंबरच्या मुख्य सोहळ्यात केली जाईल. कृषी आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा मनोरंजनाचा विशेष कार्यक्रम या प्रसंगी सादर होणार आहे.

"ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी' पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्याला एक लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. "ऍग्रोवन प्रेरणा' आणि "ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी' पुरस्काराची रक्कम प्रत्येकी 25 हजार रुपये आहे, तर विभागीय पातळीवरील "स्मार्ट शेतकरी' पुरस्कार तसेच सेंद्रिय शेती, कृषिपूरक व्यवसाय, कृषी उद्योजक पुरस्कार प्रत्येकी 10 हजार रुपयांचा आहे. सर्व पुरस्कारार्थींना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्हही दिले जाणार आहे.

ॲग्रोवन स्मार्ट ऍवार्डस सोहळा

  • तारीख : 29 डिसेंबर
  • स्थळ ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे
  • वेळ : सायंकाळी 4 ते 7 वाजता
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com