agriculture news in Marathi, agrowon, ballworm affected farmers Waiting for help | Agrowon

बोंड अळी बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 मे 2018

परभणी  ः महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नऊ तालुक्यांतील ३८ मंडळांतील बोंड अळीग्रस्त ३ लाख ५१ हजार ११८ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु, निधी प्राप्त न झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बॅंक खात्यावर मदत जमा होण्याची वाट पहात आहेत.

परभणी  ः महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नऊ तालुक्यांतील ३८ मंडळांतील बोंड अळीग्रस्त ३ लाख ५१ हजार ११८ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. परंतु, निधी प्राप्त न झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बॅंक खात्यावर मदत जमा होण्याची वाट पहात आहेत.

२०१७ मध्ये लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पेरणी अहवालानुसार गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७०९ हेक्टरवर लागवड झालेले कपाशीचे संपूर्ण क्षेत्र बोंड अळीमुळे बाधित झाल्याचे कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते.

परंतु, त्यानंतर कृषी सहाय्यक आणि तलाठी यांच्या पथकामार्फत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे केल्यानंतर ३ लाख ५१ हजार ३२६ शेतकऱ्यांनी २ लाख ३३ हजार ४०३ हेक्टरवर कपाशीची लागवड केल्याचे आढळून आले. त्यापैकी ३ लाख ५१ हजार ११८ शेतकऱ्यांच्या जिरायती क्षेत्रावरील २ लाख ३३ हजार २४ हेक्टरवरील कपाशीचे बोंड अळीमुळे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले. 

बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून २०८ शेतकऱ्यांची ३७९ हेक्टरवरील कपाशी अबाधित राहिल्याचे नुकसानीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रावरील कपाशीचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ३७ हजार ९८६ असून या शेतकऱ्यांचे एकूण २ लाख ६० हजार २२.३० हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे. १३ हजार १५० शेतकऱ्यांचे दोन हेक्टरहून अधिक कपाशीचे बोंड अळीमुळे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांचे एकूण बाधित क्षेत्र ७३ हजार १०१.७० हेक्टर आहे. 

किमान १ हजार रुपये मदत मिळणार
बोंड अळीमुळे नुकसान झालेले सर्व क्षेत्र हे जिरायती क्षेत्रातील आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण बल (एनडीआरएफ) निकषानुसार प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये देण्यात येणार आहे. २ हेक्टर पर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत किमान १ हजार रुपये तर २ हेक्टरपेक्षा अधिक जमिन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीतजास्त २ हेक्टर पर्यंत मदत दिली जाईल. त्यासाठी एकूण १५७ कोटी ९७ लाख ९१ हजार ६४० कोटी रुपये निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, अद्याप शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी निधी प्राप्त झालेला नाही असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...