agriculture news in Marathi, agrowon, The ban on mohaflu rises | Agrowon

मोहफुलावरील बंदी उठली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे महत्त्व लक्षात घेता, शासनाने यावरील संपूर्ण बंदी उठवली असून, याची साठवणूक, वाहतूक, विक्रीसाठी कोणत्याही प्रकारच्या परवान्याची गरज नसेल. 

नागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे महत्त्व लक्षात घेता, शासनाने यावरील संपूर्ण बंदी उठवली असून, याची साठवणूक, वाहतूक, विक्रीसाठी कोणत्याही प्रकारच्या परवान्याची गरज नसेल. 

यामुळे आता आदिवासी व्यक्ती स्वत:साठी मोहफुलापासून पारंपरिक पेय तयार करू शकतील. मात्र, याचा लाभ फक्त मागास तालुक्‍यातील आदिवासींना मिळणार आहे. जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजासाठी मोहफूल महत्त्वाचा घटक आहे. मोहफुलांचा आहारात वापर होतो. मात्र, शासनाकडून याच्या वापरावर निर्बंध घातल्याने त्यांचे मोठे नुकसान होत होते. मोहफुलाच्या वापरासाठी वनविभागाकडून जंगलातील लोकांवर कारवाईसुद्धा होती होती.

आदिवासी समाजातील लोकांकडून मोहफुलाचा उपयोग आहारात करण्यात येतो. त्यामुळे त्यांच्याकडून मोहफुलाची साठवणूक करण्यात येते. तसेच याची विक्रीही करण्यात येते. मात्र, शासनाकडून याचे वापर आणि विक्रीवर निर्बंध घालण्यात आला होता. तसेच यासाठी  परवान्याचीही अट घातली होती.  शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना पाच किलोपर्यंतचे मोहफूल ठेवता येत होते. त्यानंतर २५ किलोपर्यंतच्या मोहफुलाच्या साठवणुकीसाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्‍यक केली होती. वनाधिकऱ्यांकडूनही त्यांची मुस्कटदाबी होत होती. यामुळे जंगलातील आदिवासी लोकांची मोठी अडचण होत होती. मोहफुलावरून आदिवासी आणि वनाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे मोहफुलावरील निर्बंध उठविण्याची मागणी होत होती.

व्यावसायिक वापर शक्‍य नाही

आदिवासी लोकांची मागणी लक्षात घेता शासनाने मोहफुलावरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे शासनाकडून आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या (शेड्युल्ड एरिया) क्षेत्रात राहणारा व्यक्तीस अमर्याद मोहफुलाची साठवणूक करता येणार असून, त्याची विक्रीही करता येईल. यासाठी कोणत्याही परवान्याची किंवा कुणाच्या मंजुरीची गरज नाही. याचा व्यावसायिक वापर करता येणार नाही. मात्र, मोहफुलांपासून पारंपरिक पेय तयार करता येणार आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...