योजनांचा लाभ आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर

योजनांचा लाभ आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर
योजनांचा लाभ आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर

पुणे  ः जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्‍तिक लाभ योजनांचे थेट लाभ हस्तांतराचे काम पूर्ण झाले आहे. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५६५ लाभार्थ्यांना एकूण ४ कोटी ४४ लाख २९ हजार रुपयांची रक्कम येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या योजनांचा थेट लाभ जिल्हास्तरावरून देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी फक्त कृषी विभागांच्या योजनांचे लाभ जिल्हा स्तरावरुन तर उर्वरित विभागांच्या लाभ तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत गतवर्षी ६३ लाभार्थ्यांना दोन एचपी बोअरवेल मोटार, २९७ लाभार्थ्यांना तीन एचपी आेपन वेल मोटार पंपसंच, ३३२ लाभार्थ्यांना पाच एचपी मोटार पंपसंच आणि १८२ लाभार्थ्यांना ७.५ एचपी मोटार पंपसंचासाठीच्या अनुदानाचे एकूण ३७ कोटी ९८ लाख रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या शिवाय ७५ एम. एम. ९० एमएम पीव्हीसी पाइप, ७५ एमएम एचडीपीई पाइपासाठी ११९९ लाभार्थ्यांना २ लाख २६ हजार रुपये दिले जाणार आहेत. ३ एचपी पेट्रोडिझेल पंपसंच खरेदी करणाऱ्या ३२ आणि ३ एचपी पेट्रोकेरोसिन पंपसंच घेणाऱ्या ३० लाभार्थ्यांना मिळून ५ लाख ५२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

बॅटरी स्प्रेपंप घेणाऱ्या २७१, एचटीपी स्पेपंप आॅईल इंजिनासाठी २० लाभार्थ्यांना ३ लाख २० हजार रुपये, प्लॅस्टिक क्रेटसाठी १५४ शेतकऱ्यांना ३ लाख १४ हजार रुपये, प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी २२ लाख ११ हजार रुपये, सायकल कोळप्यासाठी ५ शेतकऱ्यांना ३ हजार १०० रुपये, ट्रक्टरचलित दोन फाळी सरी रिझरसाठी १०० शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपये, २ एपी इलेक्ट्रीक कडबा कुट्टीसाठी ९२५ शेतकऱ्यांना १ कोटी ६२ लाख ३२ हजार रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. 

प्रस्ताव पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकच वेळी रक्कम पोचावी याची खबरदारी घेण्यात आली आहे. लाभ देताना पैसे परत येऊ नयेत, यासाठी त्यांच्या बॅंक खात्याच्या माहितीची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे जमा करण्यास उशीर झाला. आठ दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.   - सुनील खैरनार, जिल्हा कृषी विकास अधिकारी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com