भंडारा-गोंदिया : मधुकर कुकडे राष्ट्रवादीचे उमेदवार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवाराची अखेर घोषणा करण्यात आली. माजी आमदार मधुकर कुकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ताणलेली उत्सुकता संपली आहे.

भाजपने हेमंत पटले यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मधुकर कुकडे यांची उमेदवारी जाहीर केली. मधुकर कुकडे भंडारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते १९९५ मध्ये पहिल्यांदा तुमसर (जि. भंडारा) विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग तीनवेळा ते भाजपचे आमदार झाले. २००९ मध्ये तुमसर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.

या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस का काँग्रेसचा उमेदवार राहील, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. भाजपतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले निवडणूक लढणार, अशीही चर्चा होती. हा वाद दिल्लीपर्यंत पोचला होता. अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची समजूत काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण? याबद्दलही उत्सुकता ताणलेली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com