agriculture news in Marathi, agrowon, 'BJP neglects western Maharashtra' | Agrowon

भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कऱ्हाड, जि. सातारा : स्वतंत्र विदर्भाबाबतची मुख्यमंत्र्यांची घोषणा हे राजकीय स्वार्थासाठीचे पोकळ आश्‍वासन असून, भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रवर साडे तीन वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

कऱ्हाड, जि. सातारा : स्वतंत्र विदर्भाबाबतची मुख्यमंत्र्यांची घोषणा हे राजकीय स्वार्थासाठीचे पोकळ आश्‍वासन असून, भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रवर साडे तीन वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे आली. येथील प्रीतिसंगमावरील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळावर अभिवादन केल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार चित्रा वाघ आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, की शिवसेना डबल गेम खेळते आहे. सत्तेत राहून निर्णय प्रक्रियेत सहभागी होते. साडेतीन वर्षांत एकदातरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या १२ मंत्र्यांनी विरोध केल्याचे ऐकीवात नाही. मात्र निर्णय एकत्रित घ्यायचा, एखादा निर्णय प्रमुखांना न आवडल्यास त्याविरोधात बोलायचे, असे त्यांचे सुरू आहे. 

उदयनराजे वरिष्ठ नेते...

खासदार उदयनराजे भोसले हल्लाबोल यात्रेतील अनुपस्थितीबाबत ते म्हणाले, की खासदारांचे काम स्वयंभू पद्धतीचे आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा जिल्ह्यात येतात, तेव्हा ते त्यांच्यासोबत असतात. इतरवेळी त्यांना लोकसभेचे तसेच अन्य मोठे व्याप आहेत. त्यामुळे छोटे कार्यकर्ते आल्यावर ज्येष्ठ नेते पवार यांच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांनी आमच्याबरोबर राहणे बरोबर नाही. ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात, असाही खोचक टोला अजित पवार यांनी लगावला. 

इतर बातम्या
पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोकोअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा...
प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील...परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा...
मराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबूनऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई भीषणतेच्या...
खानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ जळगाव : हिवाळ्याचे दिवस अंतिम टप्प्यात असतानाच...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकीजळगाव : जिल्हा परिषदेत प्रशासन सदस्य,...
दरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करानांदेड : दरेसरसम (ता. हिमायतनगर) येथील साठवण...
`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळतीसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात...
`सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची...सोलापूर  : टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी...
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३...सोलापूर : गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्हा...
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...