agriculture news in marathi, agrowon, Brinjal market rate, Jalgaon | Agrowon

जळगावात वांगी प्रतिक्विंटल १२०० ते २३०० रुपये
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पाणीदार, कमी बिया व शुभ्र गर असे या गावांमधील वांग्यांचे वैशिष्ट्य असते. या गावांमधील वांग्यांना बाजार समितीमधील मोठ्या अडतदारांकडे विशेष मागणी राहिली.

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरिताच्या वांग्याची आवक मागील आठवड्यात काहीशी वाढली. आवकेची सरासरी प्रतिदिन ३० क्विंटलपर्यंत आवक आहे, त्यास १२०० ते २३०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. 

दिवाळीपूर्वी भरिताच्या वांग्याची आवक सुरू होते. यंदा आवक वेळेत सुरू झाली. आवक बामणोद, भालोद (ता.यावल), आसोदे, भादली, विदगाव, डिकसाई (ता. जळगाव) आदी गावांमधून होत आहे. या गावांमध्ये परंपरेनुसार वांगी लागवड केली जाते.

पाणीदार, कमी बिया व शुभ्र गर असे या गावांमधील वांग्यांचे वैशिष्ट्य असते. या गावांमधील वांग्यांना बाजार समितीमधील मोठ्या अडतदारांकडे विशेष मागणी राहिली. या महिन्याच्या सुरवातीला आवक काहीशी कमी होती. परंतु मागील आठवड्यात आवक वाढतच गेली. पुढील काळात आवकेत आणखी वाढ होईल, असे संकेत मिळाले आहेत. 

बाजार समितीमध्ये मुगाची प्रतिदिन १५० क्विंटल सरासरी आवक आहे. दर ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर उडदाची आवक प्रतिदिन ८०० क्विंटल एवढी राहिली असून, दर सरासरी ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाले. मागील आठवड्यात मुगाच्या आवकेत मोठी घट झाली. तर उडदाच्या आवकेतही घट होत असल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले. 

यासोबत कोथिंबीर, भेंडी व गवार यांच्या आवकेतही घट झाली. कोथिंबिरीला तर सरासरी ६५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला व आवक सरासरी सहा क्विंटल एवढी होती. हिवाळी भेंडीची आवक सुरू होत आहे. तिला एकच १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. गंगाफळा, पोकळ्याची आवक मात्र नगण्यच राहिली. 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...