agriculture news in Marathi, agrowon, Bull work without owner | Agrowon

...जीव लावलाय मालकावरी
राजकुमार चौगुले
रविवार, 25 मार्च 2018

कोल्हापूर : ‘गेली सांगून ज्ञानेश्‍वरी, माणसापरीस मेंढरं बरी’ या गाण्याचे बोल ऐकले की मुक्‍या जनावरांच्या प्रामाणिकपणाचे चित्र उभे राहाते. या गाण्यातील ‘काय बोलत नाय, काय मागत नाय, जीव लावतंय मालकावरी’ या ओळी नक्कीच अंतर्मुख करणाऱ्या आहेत. अगदी या ओळी चपखल बसतील असा प्रामाणिकपणा आणि शिस्त औरवाडमधील एका ‘राज’ नावाच्या बैलाने जपली आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेतातून मालक नसतानाही चाऱ्याने भरलेली गाडी घरी आणण्याचे काम हा बैल गेल्या वर्षभरापासून नित्यनियमाने करीत आहे.

कोल्हापूर : ‘गेली सांगून ज्ञानेश्‍वरी, माणसापरीस मेंढरं बरी’ या गाण्याचे बोल ऐकले की मुक्‍या जनावरांच्या प्रामाणिकपणाचे चित्र उभे राहाते. या गाण्यातील ‘काय बोलत नाय, काय मागत नाय, जीव लावतंय मालकावरी’ या ओळी नक्कीच अंतर्मुख करणाऱ्या आहेत. अगदी या ओळी चपखल बसतील असा प्रामाणिकपणा आणि शिस्त औरवाडमधील एका ‘राज’ नावाच्या बैलाने जपली आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेतातून मालक नसतानाही चाऱ्याने भरलेली गाडी घरी आणण्याचे काम हा बैल गेल्या वर्षभरापासून नित्यनियमाने करीत आहे.

वैरण गाडीत भरली आणि त्याला निघण्याचा इशारा केला, की तो रस्त्याच्या एका बाजूने मार्गाक्रमण करण्यास सुरवात करतो. रहदारीचा रस्ता असला तरी इतर कोणत्याही वाहनाला अडचण न करता आपल्या ठरलेल्या मार्गाने हा बैल भरलेली वैरण धन्याच्या घरात सुखरूप पोच करतो. तेव्हा धन्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळे समाधान पसरते. आजच्या युगात मनुष्यावरही विश्‍वास ठेवणे कठीण बनत असताना या बैलाची निरपेक्ष सेवा परिसरात चांगलीच चर्चेची ठरली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना विश्‍वास बसणार नाही, अशा पद्धतीने बैलाचे चाललेले काम थक्क करून जाते. 

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असणारे औरवाड हे गाव. नृसिंहवाडी आणि औरवाडमध्ये फक्त नदीचेच अंतर आहे. या गावचे सरपंच अश्रफ पटेल यांची औरवाडमध्ये एकत्रित शेती आहे. यामुळे त्यांना दररोज जनावरांसाठी चारा आणावा लागतो. हे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. या अगोदरही त्यांची बैलजोडी होती. त्या बैलजोडीबरोबर हा बैलही जायचाच. कालांतराने ते बैल विकल्यानंतर याला जुंपण्यात आले. एक दोन वेळा गाडीच्या मागे चालत जाऊन बैल जातोय की नाही याचा प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर वैरण भरलेल्या गाडीबरोबर कुणीही जात नाही.

अनोखी पद्धत
पटेल कुटुंबीयांची शेती विविध ठिकाणी आहे. जर घरातून बैल जुंपून त्याला जाण्याचा इशारा केला, की मोकळी गाडी घेऊन बैल मळीच्या शेतात जातो आणि वैरण भरली की परत घरी येतो. इतर ठिकाणीही पटेल कुटुंबीयांची शेती आहे. मळी सोडून इतर ठिकाणची वैरण आणायची झाल्यास त्याच्या बरोबर एखादी व्यक्ती जाते. तिथे वैरण भररल्यांनतर मात्र पुन्हा हा बैल एकटा घराकडे येतो. कोणत्याही शेतातून हा बैल एकटा वैरण घेऊन येतो. 

आज प्रामाणिकपणा, निष्ठा याबाबी कमी होत आहेत. पण निष्ठेने कसे काम करायचे हे शिकायचे असेल तर आमचा ‘राज’ याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जनावरांकडूनही काही बाबी शिकण्यासारख्या असतात. हा बैल आमची प्रेरणा आहे. 
- अश्रफ पटेल, 
सरपंच, औरवाड, जि. कोल्हापूर

टॅग्स

इतर बातम्या
हॉर्सशू खेकडे हे कोळ्यांच्या अत्यंत...घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
पुणे-मुळशी बाजार समितीच्या विलीनीकरणास...पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची पाचव्यांदा...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
जलसंवर्धन आणि नियोजनासाठी संशोधनात्मक...औरंगाबाद : ज्याप्रमाणे अन्नधान्य टंचाईच्या काळात...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...