agriculture news in Marathi, agrowon, Business loan for backward class youth | Agrowon

मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी कर्ज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई  : मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या ४४९ औद्योगिक सहकारी संस्थांना येत्या महिनाभरात टप्प्या टप्प्याने अर्थसाह्य करण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई  : मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना उद्योगासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या अनुसूचित जातीसाठी असणाऱ्या ४४९ औद्योगिक सहकारी संस्थांना येत्या महिनाभरात टप्प्या टप्प्याने अर्थसाह्य करण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत दिली.

भाजपचे विनायक मेटे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडत या संस्थांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवल्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा निदर्शनाला आणून दिला. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री. बडोले यांनी सरकारची या औद्योगिक सहकारी संस्थांबद्दल सकारात्मक भूमिका आहे, सध्या या संस्थांची छाननी सुरू आहे. त्यानंतर या औद्योगिक संस्थांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असे सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चे दरम्यान ही योजना बंद करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. या संस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची तसेच या योजनेसाठी जाचक अटी लावून या योजनेचा लाभ घेण्यापासून मागासवर्गीय संस्थांना वंचित ठेवल्याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागातल्या रचना आणि कार्यपद्धती अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत येत्या दोन महिन्यांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा बडोले यांनी या वेळी केली. 

भूसंपादनातील तक्रारींमुळे 
पनवेल-इंदापूरचा पहिला टप्पा रखडला 

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झाराप या दुसऱ्या टप्प्यातील काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र, भूसंपादनातील तक्रारीच्या दाव्यांमुळे पनवेल-इंदापूर हा पहिला टप्पा रखडला आहे, असे सांगत हे दावे निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर सुनावण्या घेण्यात येतील, तसेच यासंदर्भात येत्या सोमवारी जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलावणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या रखडलेल्या कामाबात पाटील यांनी या वेळी हतबलता व्यक्त केली. 

संभाजी भिडेंना अटक करा 
कोरेगाव भीमाप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. भिडे यांना कधी अटक करणार याबाबत सरकारने निवेदन द्यावे, असे निर्देश सभापतींनी दिले.

इतर बातम्या
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त’ १११ गावांत...परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात...
येवला तालुक्‍यात रब्बीचे भवितव्य...येवला : खरिपालाच पाणी नव्हते. आजतर प्यायलाही...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
खानदेशातील पाच साखर कारखाने सुरूजळगाव : खानदेशात पाच साखर कारखान्यांमध्ये गाळप...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
मागणीनंतर दोन दिवसांत टँकरचा प्रस्ताव...सोलापूर : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकरबाबतचा...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...