नगर जिल्ह्यात ५४ हजार क्विंटल हरभरा खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ५ हजार पाचशे २५ शेतकऱ्यांकडून ५४ हजार ५२६ क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. अजून साधारण ७० हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११ हजार ८५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.  नगर जिल्ह्यामध्ये यंदा तुरीप्रमाणेच हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे. मात्र बाजारात व्यापारी दर्जा नसल्याचे सांगत हमीभावापेक्षा साधारण एक हजार रुपये कमी दराने हरभरा खरेदी करत असल्यामुळे तुरीप्रमाणेच हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी वाढली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये हमीदराने खरेदीसाठी हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये बारा केंद्रांवर खरेदी सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर (८५ हजार ४५३ हेक्‍टर) हरभऱ्याचे पीक घेतले गेले असल्याने उत्पादनही चांगले निघाले आहे. एक-दोन ठिकाणचे अपवाद वगळता मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची अडचण समजून तूर खरेदी केंद्रांवरच हरभरा खरेदी केंद्रे सुरू आहेत. 

यंदा साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याची अपेक्षा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली आहे. आतापर्यंत ५,५२५ शेतकऱ्यांकडून ५४ हजार ५२६ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. तुरीप्रमाणेच हरभरा विक्रीसाठीही शेतकऱ्यांना अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत ११ हजार ८५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्रासाठी बारदान्याची मागणी केलेली आहे. शनिवारपर्यंत बारदाना उपलब्ध झालेला नाही. बारदाना उपलब्ध न झाल्यास हरभरा खरेदीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com