agriculture news in Marathi, agrowon, Buy three and a half quintals of tur | Agrowon

लातूर व बीड या दोन जिल्ह्यांत साडेतीन लाख क्‍विंटल तुरीची खरेदी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

औरंगाबाद  : मराठवाड्यातील तुरीचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर व बीड या दोन जिल्ह्यांत २५ खरेदी केंद्रांवरून हमीदराने ३ लाख ६२ हजार क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.

औरंगाबाद  : मराठवाड्यातील तुरीचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर व बीड या दोन जिल्ह्यांत २५ खरेदी केंद्रांवरून हमीदराने ३ लाख ६२ हजार क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.

खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी १ लाख ६४ हजार क्‍विंटल तुरीला साठवण्यासाठी गोदामांमध्ये जागा मिळाली असून, अजूनही ९७ हजार ९०० क्‍विंटल तुरीला साठवण्यासाठी जागेचा प्रश्न कायम आहे. 
प्राप्त माहितीनुसार बीड जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीची १५ केंद्रे सुरू करण्यात आली. या खरेदी केंद्रांवरून खरेदी केल्या जाणाऱ्या तुरीला साठवण्यासाठी जागाच नसल्याने काही केंद्रांवर तुरीच्या खरेदीला ब्रेक लागला आहे.

बुधवारी (ता. ११) बीडमधील तूर खरेदीच्या १५ पैकी केवळ सात केंद्रांवरच तुरीची खरेदी सुरू होती. १५ केंद्रांवरून ४ हजार ११० शेतकऱ्यांकडून निर्धारित प्रमाणात १ लाख ३६ हजार क्‍विंटल तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली असून, त्यापैकी ५७ हजार ४०२ क्‍विंटल तुरीलाच साठवण्यासाठी गोदामांमध्ये जागा उपलब्ध झाली. ७८ हजार ८०० क्‍विंटल तुरीला साठवण्यासाठी जागेचा प्रश्न कायम आहे. 

लातूर जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीची दहा केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवरून ११ हजार ७९८ शेतकऱ्यांकडून १ लाख २६ हजार १८९ क्‍विंटल तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली. लातूरमध्येही मध्यंतरी खरेदी केलेल्या एकूण तुरीपैकी निम्मी तूर जागेअभावी केंद्रावरच पडून असल्याचे चित्र होते. आता मात्र १ लाख ७ हजार क्‍विंटल तूर गोदामात साठवण्यात आली असून, १९ हजार ४८ क्‍विंटल हमी

दराने खरेदी केलेल्या तुरीच्या साठवण्यासाठी जागेचा प्रश्न कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
दरम्यान बीड व लातूर जिल्ह्यांतील पाच केंद्रावरून १३ हजार ३०० क्‍विंटल हरभऱ्याची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...