agriculture news in Marathi, agrowon, call me any time for farmers problems | Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही बोलवा : हार्दिक पटेल
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त अाहेत. तुम्ही मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कधीही बोलवा, मी या लढ्यात महाराष्ट्रातही काम करण्यास तयार अाहे. मला देशपातळीवरसुद्धा काही काम करायचे असेल तर सांगा, ती जबाबदारी स्वीकारू, असे अाश्वासन पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान दिले.  

अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त अाहेत. तुम्ही मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कधीही बोलवा, मी या लढ्यात महाराष्ट्रातही काम करण्यास तयार अाहे. मला देशपातळीवरसुद्धा काही काम करायचे असेल तर सांगा, ती जबाबदारी स्वीकारू, असे अाश्वासन पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान दिले.  

शुक्रवारी हार्दिक पटेल यांची अकोल्यात जाहीर सभा झाली. यावेळी स्वाभिमानीचे युवा नेते रविकांत तुपकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमापूर्वी या दोन तरुण नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी श्री. पटेल यांनी दूरध्वनीवरून खासदार राजू शेट्टींसोबत चर्चा केली.  तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढाईसाठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे सांगितले.

विद्यमान सरकारने कुठलेही अाश्वासन पाळलेले नाही. यामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत अाहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून दूर झाली याबाबत त्यांनी रविकांत तुपकर व स्वाभिमानी संघटनेचे खास कौतुक केले.

महाराष्ट्रातही गाजवणार सभा
गुजरातमध्ये हजारोंच्या सभा गाजवून देशपातळीवर चर्चेत अालेल्या हार्दिक पटेलचे अागामी लक्ष महाराष्ट्रावर अाहे. हार्दिक यापुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून मार्गदर्शन करणार अाहे. शुक्रवारी झालेल्या चर्चेत तुपकर यांनी हार्दिक यांना राज्यात सभा घेण्याचे अामंत्रण देताच तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवाल त्यावेळी राज्यात येईल, असेही पटेल यांनी सांगितले.  

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...