agriculture news in marathi, Agrowon, canal repair through CSR fund, Minister Vijay Shivtare | Agrowon

सीएसआर फंडातून कालवा दुरुस्तीवर विचार : शिवतारे
संतोष मुंढे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पैठण, जि. औरंगाबाद : कालवा, चाऱ्या, पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारकडे निधी उपलब्ध नाही, हे मान्य आहे. परंतु दुरुस्तीसाठी निधी उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न असून सीएसआर फंडाच्या माध्यमातून जलयुक्‍त शिवार योजनेप्रमाणे कालवा, चाऱ्या, पोटचाऱ्यांची दुरुस्ती करता येईल का, याचाही विचार सुरू असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

पैठण, जि. औरंगाबाद : कालवा, चाऱ्या, पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारकडे निधी उपलब्ध नाही, हे मान्य आहे. परंतु दुरुस्तीसाठी निधी उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न असून सीएसआर फंडाच्या माध्यमातून जलयुक्‍त शिवार योजनेप्रमाणे कालवा, चाऱ्या, पोटचाऱ्यांची दुरुस्ती करता येईल का, याचाही विचार सुरू असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

पैठण तालुक्‍यातील जायकवाडी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी श्री. शिवतारे गुरुवारी (ता. २८) पैठणला आले होते. त्यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. श्री. शिवतारे म्हणाले, तब्बल नऊ वर्षानंतर जायकवाडी धरण भरले आहे. त्याची पाहणी तसेच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अडचणी समजून घेतल्या.

धरणाचे दोन्ही कालवे नादुरुस्त आहेत, पोटचाऱ्याही उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्यामुळे दुरुस्ती केल्याशिवाय हे वापरणे शक्‍य नाही. म्हणून वॉर फुटिंगवर ही कामे केली जातील. मंगळवारी बैठकीत याबाबत बैठक घेऊन निधी अंतिम निर्णय केला जाईल. यासाठी सीएसआर फंडातून काम करता येईल का, याचा ही विचार केला जाईल.

पाणी असून शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही तर फायदा काय असा प्रश्न पडतोय. या आधी निधी न मिळाल्याने ही काम होऊ शकली नाहीत. निधी उपलब्धतेसाठी जी पाणीपट्टी बजेटला जाते त्याऐवजी ती त्या-त्या मंडळ स्तरावर उपलब्ध करून देत कालवा, चाऱ्या पोटचाऱ्या दुरुस्तीसाठी निधी वाढविण्याचा प्रयत्न आहे.

येत्या महिनाभरात त्यामधील त्रुटी दूर केल्या जातील. सोबतच दरसूचीही दुरुस्त केली जाईल. त्यामुळे निधी उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे. कृष्णेच पाणी, कृष्णा भीमा स्थिरीकरण, याबाबत ही तातडीने चर्चा करून प्रश्न सोडवणार. पंतप्रधान कृषी सिंचन योजना, नाबार्डचे कर्ज आदीच्या माध्यमातून प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी उभा करण्याचे प्रयत्न आहेत, अशे श्री. शिवतारे  म्हणाले.
 

शाश्वत सिंचनासाठी पुढाकार घ्या
जलसंपदा व जलसंधारण विभागातील तरुण अभियंत्यांनी ध्येय आणि काळाची गरज लक्षात घेऊन दुष्काळ निर्मूलनासाठी आणि शाश्वत सिंचनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. श्री. शिवतारे यांनी गुरुवारी (ता. २८) जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) मध्ये जलसंपदा विभागातील नवनियुक्‍त सहायक अभियंता श्रोणी २ आणि कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. श्री शिवतारे म्हणाले, नवनियुक्‍त अभियंत्यांनी तत्वाधिष्ठित व ‘मिशनमोड’मध्ये काम करावे.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...