कोल्हापुरात ढोबळी मिरचीचे दर स्थिरावले

ढोबळी मिरची
ढोबळी मिरची

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात ढोबळी मिरची, गवारीचे दर समाधानकारक राहिले. ढोबळी मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये; तर गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. गेल्या सप्ताहाप्रमाणे याही सप्ताहात अनेक ठिकाणी पाऊस असल्याने भाजीपाल्याची आवक फारशी वाढली नाही. गेल्या सप्ताहात रताळ्याची आवक सातत्याने एक हजार पोत्यांच्या आसपास झाली होती. यात या सप्ताहात चाळीस टक्क्यांपर्यंत घट झाली. रताळ्यास दहा किलोस १०० ते १५० रुपये दर मिळाला. रताळ्याची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. टोमॅटोच्या आवकेत या सप्ताहातही वाढ राहिली. टोमॅटोची दररोज दोन हजारच्या आसपास कॅरेटची आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस ४० ते १९० रुपये दर मिळाला. कारलीच्या दररोज दोनशे ते तीनशे कॅरेट आवक होती. कारलीस दहा किलोस २०० ते २७० रुपये दर होता. दोडक्‍याची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक होती. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ३६० रुपये दर मिळाला.  फळांमध्ये सीताफळाच्या आवकेत सातत्य कायम होते. सांगली, तासगाव परिसरातून सीताफळाची दररोजची आवक पाचशे ते एक हजार ढीगांची आवक झाली. पन्नास सीताफळाच्या ढिगास ५० ते १८०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची पंधरा ते वीस हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ८०० ते २४०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीच्या दर गेल्या सप्ताहाएवढेच स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कांद्याची अकरा क्विंटल आवक झाली. कांद्यास दहा किलोस ५० ते १९० रुपये दर मिळाला. बटाट्याची चार ते पाच हजार क्विंटलची आवक होती. बटाट्यास दहा किलोस ६० ते १०० रुपये इतका दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com