agriculture news in marathi, agrowon, capsicum rate stable in kolhapur | Agrowon

कोल्हापुरात ढोबळी मिरचीचे दर स्थिरावले
राजकुमार चौगुले
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात ढोबळी मिरची, गवारीचे दर समाधानकारक राहिले. ढोबळी मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये; तर गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. गेल्या सप्ताहाप्रमाणे याही सप्ताहात अनेक ठिकाणी पाऊस असल्याने भाजीपाल्याची आवक फारशी वाढली नाही.

कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात ढोबळी मिरची, गवारीचे दर समाधानकारक राहिले. ढोबळी मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये; तर गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. गेल्या सप्ताहाप्रमाणे याही सप्ताहात अनेक ठिकाणी पाऊस असल्याने भाजीपाल्याची आवक फारशी वाढली नाही.

गेल्या सप्ताहात रताळ्याची आवक सातत्याने एक हजार पोत्यांच्या आसपास झाली होती. यात या सप्ताहात चाळीस टक्क्यांपर्यंत घट झाली. रताळ्यास दहा किलोस १०० ते १५० रुपये दर मिळाला. रताळ्याची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. टोमॅटोच्या आवकेत या सप्ताहातही वाढ राहिली. टोमॅटोची दररोज दोन हजारच्या आसपास कॅरेटची आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस ४० ते १९० रुपये दर मिळाला.

कारलीच्या दररोज दोनशे ते तीनशे कॅरेट आवक होती. कारलीस दहा किलोस २०० ते २७० रुपये दर होता. दोडक्‍याची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक होती. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ३६० रुपये दर मिळाला. 

फळांमध्ये सीताफळाच्या आवकेत सातत्य कायम होते. सांगली, तासगाव परिसरातून सीताफळाची दररोजची आवक पाचशे ते एक हजार ढीगांची आवक झाली. पन्नास सीताफळाच्या ढिगास ५० ते १८०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची पंधरा ते वीस हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ८०० ते २४०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीच्या दर गेल्या सप्ताहाएवढेच स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

कांद्याची अकरा क्विंटल आवक झाली. कांद्यास दहा किलोस ५० ते १९० रुपये दर मिळाला. बटाट्याची चार ते पाच हजार क्विंटलची आवक होती. बटाट्यास दहा किलोस ६० ते १०० रुपये इतका दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात वटाणा प्रतिक्विंटल २००० ते ४५००...पुणे ः राज्यातील वटाण्याचा हंगाम सध्या सुरू झाला...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००...सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
सोलापुरात कांद्याचे दर वधारलेलेच सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हंगाम अंतिम...नाशिक : दसऱ्यापासून सुरू झालेला नाशिक भागातील...
नागपुरात सोयाबीन २८५० ते २९५० रुपयेनागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍...
कोल्हापुरात गवार, मटार तेजीतकोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल ५०० ते १२००...परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-...
राज्यात मोसंबी प्रतिक्विंटल १५०० ते...पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमध्ये मोसंबीची आवक...
नाशिकला लाल कांद्याची आवक वाढलीनाशिक : नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा शेवटच्या...
खामगावात सोयाबीन वधारलेअकोला ः नोव्हेंबरच्या सुरवातीला कमी असलेला...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्विंटल २८५० ते...नागपूर ः पंधरवाड्यापूर्वी २३०० ते २५०० रुपये क्‍...
जळगावात टोमॅटो, हिरव्या मिरचीची आवक...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २३५० ते...अकोला ः येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. १)...
परभणीत गाजर प्रतिक्विंटल ६०० ते १२००...परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ४०० ते ५२००...राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक...
झेंडूच्या दरात मोठी घसरण कोल्हापूर : दिवाळीच्या दरम्यान उच्चांकी असलेल्या...
साताऱ्यात दहा किलो पावटा ४०० ते ५००...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...