सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले

काकडी
काकडी

सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात मेथी, शेपू, कोथिंबिरीसह गाजर, काकडीचे दर वधारले. त्यांना मागणीही चांगली राहिली. संपूर्ण सप्ताहभर त्यांचे दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात पालेभाज्यांच्या दरात पुन्हा तेजी कायम राहिली. भाज्यांची आवकही चांगली होती. मागणीच्या प्रमाणात आवक असूनही पालेभाज्यांच्या दरात तेजी होती. भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. भाज्यांची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. कोथिंबिरीला प्रति शंभर पेंढ्यांसाठी ११०० ते २००० रुपये, मेथीला ८०० ते १३०० रुपये, शेपूला ५०० ते ७०० रुपये दर होता. पालेभाज्याबरोबर या सप्ताहात गाजर आणि काकडीचे दर ही चांगलेच वधारले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या दरात सातत्याने चढ-उतार होत होता. पण या सप्ताहात त्यात काहीशी सुधारणा झाली. शिवाय संपूर्ण सप्ताहभर दर टिकून राहिले. गाजराची रोज १० ते १२ क्विंटल आणि काकडीची आवक ३० ते ७० क्विंटलपर्यंत राहिली. गाजराला प्रतिक्विंटल ५०० ते १२०० व सरासरी ९०० रुपये आणि काकडीला किमान ३०० ते २५०० व सरासरी १४०० रुपये इतका दर होता. तसेच वांगी, टोमॅटोचे दरही काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवकही तुलनेने कमीच होती.  वांग्याला प्रतिक्विंटल १६०० ते ३००० रुपये आणि टोमॅटोला ४५० रुपये ते १२०० रुपये असा दर होता. कांद्याचे दर या सप्ताहात पुन्हा स्थिरच होते. कांद्याची रोज ५० ते ८० गाड्यांपर्यंत आवक झाली. या सप्ताहात आवकेत काहीशी वाढ झाली. पण मागणी चांगली असल्याने दर काहीसे स्थिरच होते. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते २५०० व सरासरी ११०० रुपये असा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com