ग्रामपंचायतीच्या स्वच्छ प्रभागाला मिळणार रोख पुरस्कार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  ः संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत आता ग्रामपंचायत स्तरावरील प्रभागालादेखील दहा हजार रुपयांच्या बक्षिसाने गौरविले जाणार आहे. त्यामुळे या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन स्वच्छता अभियाना एक चळवळ करावी, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. 

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, समाजकल्याण अधिकारी मंगला मून यांची या वेळी उपस्थिती होती. 

ग्रामपंचायतीमधील सर्वाधिक गुण घेणाऱ्या प्रत्येक उत्कृष्ट प्रभागास दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटात प्रथम आलेल्या गावाला ५० हजार रुपये, जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या गावाला पाच लाख, दुसऱ्या स्थानी असलेल्या गावाला तीन लाख आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या गावाला दोन लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. विभाग स्तरावर प्रथम आलेल्या गावाला दहा लाख आणि राज्य स्तरावर प्रथम आलेल्या गावाला २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ग्रामपंचायतींनी स्वच्छता अभियानासोबतच १३ कोटी वृक्ष लागवड अभियानात सहभागी होण्याचे आवाहनदेखील या वेळी करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com