agriculture news in Marathi, agrowon, Centers team reach at farmers home for serve | Agrowon

केंद्राचे पथक शेतकऱ्यांच्या दारी; तक्रारींचा पाऊस (Video सुद्धा)
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018

औरंगाबाद  ः प्राप्त ज्ञापनाच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झालेल्या केंद्राच्या पथकाचा विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यातील दौरा बुधवारपासून (ता. १६) सुरू झाला. पहिल्याच दिवशी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद, इतर प्रमुख पिकांचीही परिस्थिती व कृषी विभागाकडून योजना, उपाययोजना, अंमलबजावणी याविषयीच्या कृतीची माहिती जाणून घेण्याचे काम पथकाच्या सदस्यांनी केले.  

औरंगाबाद  ः प्राप्त ज्ञापनाच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झालेल्या केंद्राच्या पथकाचा विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यातील दौरा बुधवारपासून (ता. १६) सुरू झाला. पहिल्याच दिवशी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद, इतर प्रमुख पिकांचीही परिस्थिती व कृषी विभागाकडून योजना, उपाययोजना, अंमलबजावणी याविषयीच्या कृतीची माहिती जाणून घेण्याचे काम पथकाच्या सदस्यांनी केले.  

औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव व शेकटा या दोन गावांना पथकाने भेटी दिल्या. गाढेजळगाव येथील ग्रामसंसद भवनमध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांशी पथक प्रमुख श्री. अश्वनी कुमार जॉईंट सेक्रेटरी (सीड्‌स) व त्यांचे केंद्रीय पथकातील सदस्य सेंट्रल वॉटर कमीशनचे आर. डी. देशपांडे, डॉ. के. डब्ल्यु देशकर, श्रीमती चाहत सिंह, श्री.  एम.जी. टेंबुर्णे, श्री. नगराळे आदींनी संवाद साधला. कृषी आयुक्‍त एस.पी. सिंह व विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर या पथकासमवेत होते. 

शेतकरी आणि केंद्रीय पथकातील संवाद

गाढेजळगाव येथे शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य सय्यद जाबेर यांनी त्यांचे कपाशीचे क्षेत्र, खर्च, उत्पादन व उत्पन्नाचे कोलमडलेल्या गणिताची मांडणी पथकासमोर केली. दरम्यान गाढेजळगाव येथे दिलेल्या माहितीत कपाशी क्षेत्रासंबंधीच्या आकडेवर उत्तर देताना कृषी विभागाची धंदल उडाली होती. लागवड झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत पंचनाम्याअंती क्षेत्र वाढले कसे असा तो प्रश्न होता. त्यावर पथकाचे समाधान करताना कृषी विभागाची चांगलीच धांदल उडाली होती. 

दरम्यान यापुढे बोंड अळीचे संकट येणार नाही याविषयी पावले उचलण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज पथकाने व्यक्‍त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास फुलंब्री तालुक्‍यातील डोंगरगाव कवाड येथील कापूस व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पथक जालना जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाले. 

असे होते पथकाच्या प्रश्नांचे स्वरूप
नुकसानीची पातळी नेमकी किती, किती खर्च, फवारण्या किती केल्या, उपाययोजनांची माहिती नेमकी कोणी दिली, कीडनाशके कोणती वापरली, कुणी सांगितलेली कीडनाशके फवारली, विकलेल्या मालाला दर काय मिळाला, विमा उतरविला होता काय, त्याचा परतावा मिळाला का, कोणत्या कंपन्यांचे बियाणे वापरले, रेफ्युजी बियाणे लावले होते का, कशा पद्धतीने त्याची लागवड केली, उपाययोजना केल्यानंतरही काय परिणाम दिसून आला, एकरी उत्पादन नेमके किती आले, गतवर्षी किती आले होते, बागायती व कोरडवाहू खर्चाचे व उत्पादन उत्पन्नाचे गणित नेमके काय आदी प्रश्न पथकाने थेट शेतकऱ्यांना विचारले. 

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...