राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ आंदोलन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य शेतकऱ्यांच्या मागण्या, लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आजपासून उपोषण सुरू केले आहे. अण्णा हजारे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांच्या गावी राळेगणसिद्धी (जि. नगर) येथे नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. सरकारने रेल्वे व गाड्या अडविल्याचा निषेध करत सरकारच्या पुतळ्याचे गावकऱ्यांनी या वेळी दहन केले. 

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, लोकपाल व  लोकायुक्ताची अंमलबजावणी करावी, तसेच निवडणूक कायद्यात सुधारणा करावी या आणि इतर मागण्यांसाठी आजपासून (ता. २३ मार्च) दिल्ली येथे रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण, सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे सरपंच रोहणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी, रोहीदास पठारे, अरुण भालेकर, सुभाष पठाडे, संजय पठाडे यांच्यासह गावकऱ्यांनी आज सकाळपासून साखळी उपोषण सुरू केले. 

गावकरी, महिला व शाळकरी मुले त्यात सहभागी झाली आहेत. दरम्यान दिल्लीतील हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी होण्यासाठी लोक दिल्लीकडे जात असताना केंद्र सरकार दडपशाही करून रेल्वे गाड्या, वाहने अडवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करत गावकऱ्यांनी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलनात इतर गावांतील नागरिक देखील सहभागी झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com