agriculture news in Marathi, agrowon, Changes in criminal law to prevent milk adulteration | Agrowon

दूध भेसळ रोखण्यासाठी फौजदारी कायद्यात बदल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई : राज्यातील भेसळयुक्त दुधाच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने फौजदारी कायद्यात बदल करण्यास राज्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने विधी विभागाकडून कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. या कायद्यात सहा महिन्यांपर्यंत असलेली शिक्षेची मर्यादा कमीत कमी तीन वर्षे, तर जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंत करण्याचा विचार होणार आहे. लवकर हा कायदा आणला जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी (ता.१३) विधानसभेत दिली.

मुंबई : राज्यातील भेसळयुक्त दुधाच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने फौजदारी कायद्यात बदल करण्यास राज्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने विधी विभागाकडून कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. या कायद्यात सहा महिन्यांपर्यंत असलेली शिक्षेची मर्यादा कमीत कमी तीन वर्षे, तर जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंत करण्याचा विचार होणार आहे. लवकर हा कायदा आणला जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी (ता.१३) विधानसभेत दिली.

राज्यात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याप्रकरणी विधानसभा सदस्य अमित साटम, मनीषा चौधरी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री गिरीश बापट म्हणाले, की भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी फौजदारी संहिता कलम २७२ ते २७६ पर्यंतमध्ये बदल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्र सरकारने कायद्यातील कलमांच्या शिक्षेमध्ये बदल करण्यास राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यानुसार विधी विभागाच्या कायदेतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यात येत असून, शिक्षेची मर्यादा वाढविण्याचा त्यातून प्रयत्न केला जाणार आहे.

भेसळीच्या संदर्भातील कायद्यातील पळवाट रोखण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. दुधासह खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्याकरिता प्रयत्न केले जातील. कायद्यातील तरतुदीबदलाच्या दृष्टीने राज्यात १४९ ठिकाणी २४ हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वेळी चर्चेत बाळासाहेब थोरात, सुभाष साबणे, राहुल कुल, अतुल भातखळकर आदींनी भाग घेतला. 

अन्न सुरक्षा व्यवस्थापन राबविणार -
राज्यात खाद्य पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी लवकरच अन्न सुरक्षा व्यवस्थापन राबविले जाणार आहे. यामध्ये सर्वांचा समावेश केला जाईल. व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सुरक्षा ठेवण्याचे तंत्र दिले जाईल.

चार मोबाईल व्हॅनची कामगिरी असमाधानकारक
राज्यात अन्न व औषधी प्रशासनाने दुधासह अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी चार मोबाईल व्हॅन खरेदी केल्या आहेत. परंतु, या मोबाईल व्हॅनव्दारे तपासणी फारशी समाधानकारक झालेली नाही. त्याबद्दल संबंधितांना समज देण्यात येऊन त्यांना नवीन कार्यक्रम आखून दिला जाईल. मुंबईच्या मार्गावरून येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी अधिक कडक बंधने घालण्यात येतील, असे मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...