बाजार समित्यांच्या सचिवपदी सहकारातील अधिकारी

प्रतिनिधीक छायाचित्र
प्रतिनिधीक छायाचित्र

पुणे : राज्यातील बाजार समित्यांच्या सचिवपदी सहकार विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठीची प्रक्रिया सहकार आणि पणन विभागाने सुरू केली अाहे. याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार व पणन विभागाने पणन संचालकांना दिले आहेत.

२०१३ साली देखील पॅनेलच्या माध्यमातून सचिवांची नियुक्ती करण्याचा निर्णय पणन मंडळाने घेतला हाेता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी हाेत असताना सचिव नियुक्त्यांमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याच्या घटनांनतर, पणन मंडळाने थेट नियुक्त्या दिल्या हाेत्या.

थेट नियुक्त्यांना बाजार समित्यांनी विराेध करत न्यायालयात धाव घेतल्यानंतर पणन मंडळाने दिलेल्या नियुक्त्या कायम ठेवत, पुढील नियुक्‍त्यांसाठी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली; तर पणन मंडळाला नव्याने म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले हाेते. ही प्रक्रिया अद्याप न्यायप्रविष्ट असून, शासनाने आता थेट सहकार विभागातील अधिकाऱ्यांची सचिवपदी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेबाबत सहकार, पणन विभागाने पणन संचालकांना पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये सचिव पॅनेलमधील नियुक्तीबाबतचे आदेश न्यायप्रविष्ट असल्यामुळे अनेक बाजार समित्यांनी सचिवपदी समितीमधील कनिष्ट कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देऊन, किंवा अतिरिक्त कार्यभार देऊन कामकाज चालविले आहे.

यामुळे बाजार समितीचे कामकाज पूर्ण कार्यक्षमतेने किंवा निपक्षपातीपणे चालविण्यात अडथळे येण्याचा संभव असताे, असे स्पष्ट केले आहे. यामुळे बाजार समित्यांचे कामकाज निपक्षपातीपणे आणि पूर्ण कार्यक्षमतेने हाेण्यासाठी सचिवपद हे एकल पद असून, सरळ सेवा भरतीने करण्यात येणार आहे. असे स्पष्ट करत बाजार समित्यांच्या वर्गीकरणानुसार सहकार विभागातील त्या दर्जाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

याबाबत शासनाने वारंवार पाच स्मरण पत्रे पणन संचालकांना दिली असून, अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२०१ समित्यांवर सचिव कार्यरत राज्यात ३०७ बाजार समित्या असून, २०१ समित्यांवर सचिव कार्यरत आहेत; तर उर्वरित ९८ समित्यांवर प्रभारी सचिव कार्यरत असून, ८ समित्यांमधील जागा रिक्त आहेत.

अशी असेल नियुक्ती

१ ते ५ काेटी         तालुका सहा. निबंधक ५ ते १० काेटी       उपनिबंधक १० ते २० काेटी     सहनिबंधक २० काेटींच्या पुढे   अप्पर निबंधक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com