ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा

अकोला ः मोताळा येथे एसबीअायच्या एटीएमचे प्रतीकात्मक पूजन करताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते.
अकोला ः मोताळा येथे एसबीअायच्या एटीएमचे प्रतीकात्मक पूजन करताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते.

अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा निर्माण झाल्याचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणवू लागला अाहे. ठिकठिकाणचे एटीएम रोकडअभावी बंद पडलेले अाहेत. पैशांची ही मागणी नेमकी कशामुळे वाढली अाहे, याबाबत बँक अधिकाऱ्यांमध्ये अाश्चर्य व्यक्त होऊ लागले अाहे.

चलन तुटवड्यामुळे शेतीची कामे खोळंबली 

गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही बँकांमध्ये चलनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम शेतीच्या आर्थिक व्यवस्थेवर होत आहे. अनेक ठिकाणी चलनाच्या तुटवड्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. बँकेने चलन पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  पुणे जिल्ह्यात जवळपास ३०-३२ विविध प्रकारच्या बँका आहेत. या सर्व बँकेच्या सुमारे १६१५ शाखा आहेत. तर शाखांच्या सुमारे दोन हजाराहून अधिक एटीम आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी एटीएममधून पैसै काढत असतात. परंतु मागील दोन ते तीन दिवसांपासून भासत असलेल्या चलन तुटवड्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे शहरातील काही एटीएममध्ये चलन असल्याने त्याचा फारसा त्रास होत नसल्याचे समोर आले आहे. परंतु ग्रामीण भागातील एटीएममध्ये खडखडाट असल्याचे चित्र आहे. 

परभणी जिल्हा बॅंकेत चलन तुटवडा  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नसल्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी अडचणी येत आहेत. शेतकरी तसेच विविध योजनांच्या लाभार्थींना रक्कम देण्यासाठी अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील अन्य बॅंकांमध्येही पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला करंन्सी चेस्ट स्टेट बॅंक आॅफ इंडिया कडून दररोज ५ कोटी रुपये चलनपुरवठा होणे आवश्यक आहे. परंतु दररोज जिल्हा बॅंकेच्या मागणी प्रमाणे स्टेट बॅक आॅफ इंडियाकडून रोख रकमेचा पुरवठा केला जात नाही. सध्या पीक विमा रकमेचे वाटप शेतकऱ्यांना केले जात आहे. परंतु पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्यामुळे रक्कम अदा करण्यासाठी अडचणी येत आहेत.

अकोल्यात एटीएममध्ये पैशांची चणचण

चलन तुटवड्याची झळ प्रामुख्याने एटीएमशी संलग्नित व्यवहार करणाऱ्यांना बसत अाहे. विविध बँकांचे एटीएम पुरेशा पैशांअभावी बंद होत अाहेत. या संदर्भात बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तुटवडा नसल्याचे सांगत दैनंदिन स्वरूपात मागणी असलेली रोकड बँकांना मिळते अाहे. चलन तुटवड्याचा प्रकार नाही. परंतु रोकडचे चलन वाढल्याचे मान्य केले.

मोताळ्यात एटीएमचे पूजन मोताळा येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये काही दिवसांपासून पैैसे नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सय्यद वसीम यांच्या नेतृत्वात एटीएम मशीनचे पूजन करण्यात अाहे. 

सोलापूर जिल्ह्यात अनेक बॅंकांमध्ये चलन तुटवडा देशभर सुरू असलेली नोटाटंचाईची झळ सोलापूर जिल्ह्यालाही बसली असून, शहर-जिल्ह्यांतील अनेक बॅंकांत चलन तुटवडा निर्माण  झाला आहे. शिवाय एटीएमवर पैशाविना खडखडाट दिसून येत आहे. ‘नो कॅश’सारखे फलक एटीएमबाहेर लटकावलेले आहेत. अचानकपणे उद्भवलेल्या या प्रसंगामुळे सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. १४ आणि १५ एप्रिलला सलग दोन दिवस सुट्या आल्याने ग्राहकांनी पैसे काढले नाहीत. सोमवारी आणि मंगळवारी (ता.१६, ता. १७) या दोन दिवसांत मात्र बॅंकांमध्ये एकदम गर्दी सुरू झाली. त्यातच बुधवारी (ता. १८) अक्षय तृतीयेचा सण आल्याने सामान्य लोकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. शहर-जिल्ह्यात सुमारे ३०० हून अधिक एटीएम आहेत. त्यापैकी बहुतेक एटीएममध्ये पैशाची अडचण असल्याचे सांगण्यात आले. शहराबरोबरच जिल्ह्यातही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. आणखी किमान चार दिवस हा तुटवडा भरून निघणार नाही, असे बॅंकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यातील एटीएममध्ये खडखडाट  नगर शहरासह जिल्ह्यात, तसेच देशातील काही राज्यांत चलन तुटवड्याचे परिणाम दिसून आले. बहुतांश एटीएममध्ये नोटा नसल्याने ते बंद होते. बॅंकेतही पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम दिली जात नव्हती. मात्र चलन तुटवडा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत चलन तुटवडा निर्माण झाल्याचा परिणाम नगरमध्ये दिसला. मंगळवारपासून बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याने बंद होते. बंदचे कारण तांत्रिक असल्याचे सांगितले जात होते. एटीएममध्ये पैसे नसल्याने बॅंकेत पैसे काढायला जास्त गर्दी होती. मात्र बॅंकेतही पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम दिली जात नव्हती. रोख रक्कम उपलब्ध नसल्याने आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरील खरेदीवर परिणाम झाला.

साताऱ्यात तुरळक ठिकाणी चलन तुटवडा राज्यात जाणवत असलेला चलन तुटवडा सातारा जिल्ह्यात कमी प्रमाणात दिसून येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेचे जाळे आहे. शेतकऱ्यांना व्यवहासाठी लागणारे चलन कमी पडू नये यासाठी सातारा जिल्हा बॅंकेकडून व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागात चलन तुटवडा दिसत नाही. मात्र काही राष्ट्रीयीकृत बॅंकाच्या एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी असल्या तरी हे प्रमाण कमी आहे. 

रोकडटंचाईने ग्रामीण भागातील एटीएम बंद 

धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात रोकडटंचाई वाढली आहे. परिणामी ग्रामीण भागातील एटीएम बंद असून, रोकडसाठी वणवण फिरण्याची किंवा थेट बॅंकेत जाण्याची वेळ शेतकरी, ग्रामस्थांवर आली आहे. दुसरीकडे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंक, जळगाव जिल्हा बॅंक आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्ज वितरण अजूनही सुरू केेले नसल्याची माहिती मिळाली आहे. रोकडटंचाईमुळे बॅंकांनी पीककर्ज वितरण सुरू केले नाही, अशी चर्चा आहे. परंतु या चर्चेला कुणीही अधिकारी व बॅंकेचे पदाधिकारी यांनी पुष्टी दिलेली नाही. धुळे व जळगाव जिल्ह्यांत ग्रामीण भागात जिल्हा बॅंकांचे एटीएम नाहीत. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांचे एटीएम मोठ्या, बाजारपेठेच्या गावात असून, ते मागील १५ ते २० दिवसांपासून व्यवस्थित सुरू नाहीत. त्यात रोकड असते तर ती दुपारीच संपून जाते. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, चाळीसगाव, जळगाव, पाचोरा भागातील मोठ्या गावांमधील एटीएम नेहमीच बंद असतात, अशी माहिती मिळाली.  सांगलीत बहुतांश 

सांगलीत एटीएममध्ये नोटा उपलब्ध   सांगली शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश एटीएम मशिनवर नोटा उपलब्ध होत्या. मात्र, शेतकरी बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले असता, चार ते पाच हजार रुपये दिले जात आहेत. सांगलीत चलन तुटवडा नसला, तरी बॅंकेतून मोजकीच रक्कम दिली जात असल्याने शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. चलन टंचाईच्या बातम्यांमुळे काहींनी एटीएमवर जाऊन खात्री केली. ग्रामीण भागात एटीएम मशिन फारच कमी आहेत. त्यामुळे शेतकरी बॅंकेत जाऊन रक्कम काढतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बॅंकेतून मोजकीच रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते आहे. सध्या शेतातील मशागत, भाजीपाला लागवडी त्याचप्रमाणे हळदीचे बियाणे खरेदी करण्याचे काम शेतकरी करू लागले आहेत. बॅंकेतून मिळणारी रक्कम तोकडी पडत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीतून जावे लागते आहे.  

मी दोन ते तीन वेळा एटीएममध्ये गेलो, परंतु  पैसे निघाले नाहीत. त्यानंतर बँकेच्या शाखेत पैसे मिळाले. गेल्या आठ दिवसांपासून या अडचणी आहेत.  - शेखर गायकवाड, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com