agriculture news in Marathi, agrowon, The concept of 'Agriculture Tai' is now at the village level | Agrowon

‘कृषी ताई’ची संकल्पना आता ग्रामस्तरावर
संतोष मुंढे
सोमवार, 9 एप्रिल 2018

औरंगाबाद : मराठवाडा व विदर्भातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता ग्रामस्तरावर ‘कृषी ताई’ची संकल्पना राबविली जाणार आहे. आतापर्यंत १०३ गावांत कृषी ताईंची निवड करण्यात आली आहे.

औरंगाबाद : मराठवाडा व विदर्भातील १५ जिल्ह्यांत राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आता ग्रामस्तरावर ‘कृषी ताई’ची संकल्पना राबविली जाणार आहे. आतापर्यंत १०३ गावांत कृषी ताईंची निवड करण्यात आली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मराठवाड्यातील पंधरा जिल्ह्यात राबविल्या जात आहे. येत्या सहा वर्षांत या प्रकल्पाच्या टप्प्यात ५ हजार १४२ गावांमधील १७ लाख शेतकरी व जवळपास ३० लाख हेक्‍टर क्षेत्र येणार आहे. जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १०५० गावांमध्ये कृषी संजीवनी प्रकल्प येत्या खरीप हंगामापासून राबविल्या जाणार आहे. त्यासाठी जवळपास ३०० कोटीचा निधी चालू आर्थिक वर्षात उपलबध करून दिला जाणार आहे. 

या प्रकल्पात महिला शेतकऱ्यांवर विशेष फोकस राहणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यापासून प्रगतिशील महिला शेतकऱ्यांना ‘कृषी ताई’ म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे. या कृषी ताईची महिला आमसभेतून निवड केली जाणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रत्येक गावांमध्ये महिला शेतकऱ्यांची आमसभा घेतली जावी, त्या आमसभेत होणारे प्रत्येक निर्णय त्या सभेच्या प्रोसेडींगवर घेतले जावे, त्या प्रोसेडिंगवरील विषय ग्रामसभेमध्ये मांडून त्यामधील किती विषय ग्रामसभा मान्यता देते यासह इतरही सविस्तर नोंदी घेणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घेणे संबंधित यंत्रणेला आवश्‍यक करण्यात आले आहे.

एकूणच ग्रामविकासाच्या कार्यात महिलांचा प्रत्यक्ष सहभाग वृद्‌धींगत करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...