agriculture news in Marathi, agrowon, At Confiance Purchase Centers Differentiation in Hamali Rates | Agrowon

हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या दरामध्ये तफावत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 मार्च 2018

अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर खरेदी प्रक्रियेत हमालीचे दर वेगवेगळ्या केंद्रांवर कमी-जास्त अाकारले जात असून,  शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचा अारोप केला जात अाहे. केंद्र बदलताच हमालीचा दरही बदलत अाहे.

अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर खरेदी प्रक्रियेत हमालीचे दर वेगवेगळ्या केंद्रांवर कमी-जास्त अाकारले जात असून,  शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचा अारोप केला जात अाहे. केंद्र बदलताच हमालीचा दरही बदलत अाहे.

राज्यात सध्या हमीभावाने तूर खरेदी प्रक्रिया राबवली जात अाहे. शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी अाधीच अाॅनलाइन नोंदणी केलेली अाहे. अाता यंत्रणांकडून मेसेज अाल्यावर शेतकरी अापला शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर नेत अाहेत. या ठिकाणी माल नेल्यानंतर वाहनातून उतरविणे, त्याची चाळणी करणे येथपर्यंत शेतकऱ्यांनी हमाली द्यावी, असे प्रशासनाने अावाहन केले अाहे. त्यानंतर पुढील मोजमाप व इतर प्रक्रियेसाठी यंत्रणांकडून हमाली दिली जाते. मात्र सध्या शेतकऱ्यांनी अाणलेला शेतमाल वाहनातून उतरविणे, त्याची चाळणी करणे यासाठी शेगाव केंद्रावर ४० रुपये घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे अाहे.

अकोला येथील खरेदी केंद्रावर याच कामांसाठी २७ रुपये अाकारले जातात. काही केंद्रांवर ३० रुपये घेतले जातात. परंतु ४० रुपये दर हा शेतकऱ्यांची पिळवणूक करणारा अाहे. यंत्रणांनी याबाबत योग्य समन्वय ठेवून दर निश्चिती करण्याची मागणी शेतकरी व्यक्त करीत अाहेत.

धान्याची नासाडी अधिक
शासन एफएक्यू दर्जाचीच तूर खरेदी करीत अाहे. यासाठी शेतकऱ्यांनी अाणलेल्या मालाची चाळणी हमखास केली जाते. ही चाळणी करताना बारीक अाकाराची तूर, फुटलेले दाणे बाहेर पडतात. या शेतमालाची मजुरांकडून नासाडीसुद्धा अधिक केली जाते. एका पोत्यात चार ते पाच किलोपर्यंत असे धान्य निघते. हे धान्य व्यवस्थित हाताळले जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत अाहे.    

मी बुधवारी शेगाव खरेदी केंद्रावर तूर विकली. या ठिकाणी मला प्रति क्विंटल ४० रुपये हमाली चुकवावी लागली. मी माहिती घेतली असता इतर केंद्रावर कुठे २७ रुपये, कुठे ३० रुपये क्विंटलने हमाली घेतली जात असताना शेगाव केंद्रावर ही अधिक रक्कम घेतली जात अाहे.   
- शिवशंकर पोहरे, शेतकरी, उरळ

हमी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल उतरण्यासाठी बाजार समितीच्या दरानुसार हमाली घेणे अपेक्षित अाहे. शिवाय ही हमाली चाळणी प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्याला द्यायची अाहे. अाम्ही २० रुपये क्विंटल दर घेण्याबाबत सर्क्युलर काढलेले अाहे.
-पी. एस. शिंगणे, 
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...