agriculture news in Marathi, agrowon, congress strike in amrawati | Agrowon

शेतीप्रश्‍नी काँग्रेस नेत्यांचा आत्मदहनाचा इशारा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 मे 2018

अमरावती  ः शेती व शेतकऱ्यांशी निगडित प्रश्‍नांची सोडवणूक ३१ मेपर्यंत न केल्यास १ जून रोजी जिल्ह्यातील कााँग्रेसचे नेते आत्मदहन करतील, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी हा इशारा दिला.

अमरावती  ः शेती व शेतकऱ्यांशी निगडित प्रश्‍नांची सोडवणूक ३१ मेपर्यंत न केल्यास १ जून रोजी जिल्ह्यातील कााँग्रेसचे नेते आत्मदहन करतील, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी हा इशारा दिला.

केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकारने शेतकऱ्यांचा अनेक आघाड्यांवर विश्‍वासघात केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. खरीप हंगाम तोंडावर असताना तूर खरेदीचे पैसे दिले गेले नाही. गोदामाचे कारण पुढे करून हरभरा व तूर खरेदी रखडत ठेवण्यात आली. त्यासोबतच बोंड अळीच्या मदतीचे वाटपालादेखील अजून सुरवात झाली नाही. तूर खरेदीचे पैसे आणि बोंड अळीची मदत शेतकऱ्यांना मिळाली तर त्यांना बी-बियाण्याकरिता पैसे उपलब्ध होतील. परंतु शासन या संदर्भाने काहीच बोलण्यास तयार नाही, याचा काँग्रेसी नेत्यांनी निषेध केला. 

कर्जमाफीचा बोजवारा उडाला असून, त्यांचा फटका या हंगामात पीककर्ज वाटपाला बसणार आहे. कर्जमाफीसाठीच्या दरदिवशी बदलणाऱ्या परिपत्रकामुळे बॅंकांसमोरील अडचणीतदेखील वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामेदेखील प्रभावित झाल्याचे सांगत कााँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुरीचे चुकारे त्वरित देणार असल्याचे सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...