विक्री केंद्रांची बांधकामे कालमर्यादेत पूर्ण करा : मुंडे

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

मुंबई : राज्यातील स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या तालुका विक्री केंद्रांची बांधकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. पूर्ण झालेली केंद्रे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादित वस्तू विक्रीसाठी द्यावीत, असे निर्देश ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.

महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना तालुका स्तरावर कायमस्वरूपी विक्री केंद्रे सुरू करण्याची योजना निकृष्ठ नियोजन आणि दिरंगाईमुळे फेल ठरल्याचे ताशेरे कॅगच्या अहवालात ओढण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेअंतर्गत झालेला सुमारे साडेचौदा कोटींचा खर्च निष्फळ ठरल्याचे आणि सुमारे ३४ कोटींचा निधी तीन ते सात वर्षे धूळखात पडून असल्याबद्दलही नाराजी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

या संदर्भात अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. तसेच मंजूर असलेल्या केंद्रांसंबंधात संबंधितांनी अपूर्ण कामे, त्यासाठी लागणारा निधी, असलेल्या अडचणी यासंदर्भात येत्या १५ दिवसांत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मुंडे यांनी यावेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com