...लवकरच सहकारी रुग्णालये उभारणार !

राज्यात मुंबई, सोलापूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत मागील अनेक वर्षांपासून सहकारी रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमार्फत रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्यात येत आहेत.
हाॅस्पीटल
हाॅस्पीटल

मुंबईः राज्यात नागरिकांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात आणि दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्याच्या हेतूने सहकारी तत्त्वावरील रुग्णालये सुरू करण्यासाठी सहकार खात्यात सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नांदेड, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या ठिकाणी ही रुग्णालये सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा सहकारी उपनिबंधकांकडे या रुग्णालयांची नोंदणीही झाली असून, सध्या त्यासाठी आवश्यक भागभांडवल उभारणीसाठी नागरिक, शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. राज्यात मुंबई, सोलापूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत मागील अनेक वर्षांपासून सहकारी रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमार्फत रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा व सुविधा देण्यात येत आहेत. मुंबई येथील सुश्रूषा सहकारी रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यातील काही जिल्ह्यांत सहकारी रुग्णालय स्थापन करण्यास सहकार खात्याकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. रुग्णालयांना राज्य सरकारमार्फत शासकीय भागभांडवल देण्यासंदर्भातील धोरण ठरविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच नागरिक, शेतकरी आदी घटकांकडून शेअर्स गोळा केले जात आहेत. नांदेड जिल्ह्यात स्थानिक डॉक्टर्सनी एकत्र येऊन रुग्णालय स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही सहकारी रुग्णालय सुरू करण्याचा विचार आहे. सध्या हे रुग्णालय नोंदणीच्या प्रक्रियेत आहे.  भांडवल उभारणीचे मोठे आव्हान या सहकारी तत्त्वावरील रुग्णालयांपुढे भागभांडवल उभारणीचे मोठे आव्हान असणार आहे. रुग्णालयात पायाभूत, मूलभूत सुविधा, यंत्रसामग्री आदी बाबींसाठी मोठा निधी लागणार असल्याने राज्य सरकारकडून काही मदत देता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. मात्र, या प्रस्तावात आरोग्य विभागाच्या एका कक्ष अधिकाऱ्याने खोडा घातल्याची चर्चा आहे. सहकारी रुग्णालयांमुळे सरकारी मालकीच्या इतर रुग्णालयांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा नकारात्मक शेरा संबंधित अधिकाऱ्याने मारल्याचे सहकार खात्यातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. मात्र त्यामुळे रुग्णालयांना सरकारी भागभांडवल देण्यात कोणतीही आडकाठी येणार नसल्याचेही संबंधितांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com