agriculture news in Marathi, agrowon, Cotton planting in Washim The possibility of decreasing the area | Agrowon

वाशीममध्ये कापूस लागवड क्षेत्र घटण्याची शक्‍यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

वाशीम  ः येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात तूर, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांच्या लागवडीत मोठी वाढ होणार असून, कापसाचे क्षेत्र घटीची अपेक्षा आहे. ही बाब गृहीत धरीत जिल्हा कृषी विभागाने हंगामाचे नियोजन केले आहे. बोंडअळीच्या फटक्‍यामुळे यावेळी सुमारे साडेसात हजार हेक्‍टर कापूस क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.

वाशीम  ः येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात तूर, सोयाबीन, मूग, उडीद या प्रमुख पिकांच्या लागवडीत मोठी वाढ होणार असून, कापसाचे क्षेत्र घटीची अपेक्षा आहे. ही बाब गृहीत धरीत जिल्हा कृषी विभागाने हंगामाचे नियोजन केले आहे. बोंडअळीच्या फटक्‍यामुळे यावेळी सुमारे साडेसात हजार हेक्‍टर कापूस क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.

जिल्हा प्रशासनाने हंगामासाठी चार लाख ६७०० हेक्‍टरचे नियोजन केले आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने सोयाबीनचेच पावणेतीन लाख हेक्‍टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय तूर ६२००० हेक्‍टर, मूग १६ हजार, उडीद २० हजार तर तीळ दोन हजार आणि इतर पिके १२०० हेक्‍टर राहू शकतात. कपाशीचे क्षेत्र गेल्या वर्षी ३० हजार ९२१ हेक्‍टरपर्यंत गेले होते. यावेळी ते ७४२१ हेक्‍टरने घटून २३ हजार ५०० हेक्‍टरपर्यंत खाली येऊ शकते, असे गृहीत धरून इतर पिकांचे नियोजन करण्यात आले. 

एक लाख १ हजार क्विंटल बियाण्याची गरज
वाशीम जिल्हा हा सोयाबीनसाठी सर्वाधिक पोषक समजला जातो. त्यामुळे जिल्ह्याचे क्षेत्र हे बहुतांश याच पिकाखाली राहते. हे लक्षात घेता हंगामासाठी ९२ हजार ८१२ क्विंटल सोयाबीन बियाणे लागेल अशी मागणी करण्यात आली आहे. सोबतच तुरीचे ४१८५ क्विंटल, कपाशी ५९२, मूग १२४८, उडीद १५६०, संकरीत ज्वारी ५२५, मका ७५, तीळ ४३ क्विंटल बियाणे लागणार आहे. सोयाबीनचे बियाणे बहुतांश घरगुती वापरले जाते. या जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे बदलाचे प्रमाण ४५ टक्के अपेक्षित धरण्यात आले.

खरिपासाठी ४५ हजार टन खत मंजूर
जिल्ह्यातील पिकांची प्रामुख्याने गरज पाहता जिल्हा प्रशासनाने खत नियोजन केले. यात खरिपासाठी ४४ हजार टन खताची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून ४५ हजार ५१० मेट्रिक टनाचे आवंटन मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात प्रामुख्याने युरिया ११ हजार टन, डीएपी ८ हजार, एसएसपी ४५००, एमओपी ६०० व इतर खतांचा समावेश आहे. आतापर्यंत सुमारे १४ हजार मेट्रिक टन खत साठा उपलब्धसुद्धा झाला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...