जगातील कापूस उत्पादन वाढणार

कापूस
कापूस

मुंबई ः जगातील कापूस पीकक्षेत्रात वाढ झाली अाहे. यामुळे यंदा (२०१७-१८) जगातील कापूस उत्पादन वाढून ते २५.१४ दशलक्ष टनांपर्यंत पोचेल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने व्यक्त केला अाहे. याअाधी अाॅगस्टमध्ये जगात कापूस उत्पादन २४.९ दशलक्ष टन होईल, असा अंदाज जाहीर केला होता. त्यात अाता अाणखी वाढ होणार असल्याचे संकेत कापूस सल्लागार समितीने दिले अाहेत. यंदा जगातील कापूस लागवड क्षेत्र नऊ टक्क्यांनी वाढून ३१.९ दशलक्ष हेक्टरपर्यंत पोचले अाहे. तर यंदा प्रतिहेक्टरी उत्पादन ७८९ हेक्टरपर्यंत पोचेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे.  कापूस उत्पादनात अाघाडीवर असलेल्या भारतातील कापूस उत्पादन ४ टक्क्यांनी वाढून ६ दशलक्ष टनांपर्यंत पोचेल. तर चीनमधील उत्पादनही ७ टक्क्यांनी वाढणार अाहे. चीनमध्ये कापूस उत्पादन ५.२ दशलक्ष टन होईल. अमेरिकेतही कापूस लागवड क्षेत्रात वाढ झाली अाहे. यामुळे येथील उत्पादन २० टक्क्यांनी वाढून ४.५ दशलक्ष टनांपर्यंत पोचण्याची शक्यता अाहे. तर पाकिस्तानमधील कापूस उत्पादन १७ टक्क्यांनी वाढून २ दशलक्ष टनांपर्यंत पोचेल, असे कापूस सल्लागार समितीने अहवालात नमूद केले अाहे.  कापसाच्या शिल्लक साठ्यात घट होणार जगात यंदा (२०१७-१८) कापसाचा वापर २५.१२ दशलक्ष टन राहील. तर कापसाच्या शिल्लक साठ्यात घट होणार असल्याचे संकेत कापूस सल्लागार समितीने दिले अाहेत. जगातील कापसाचा शिल्लक साठा १८.५६ दशलक्ष टन राहणार अाहे. चीनमधील कापूस साठ्यात १६ टक्क्यांनी घट होऊन तो ८.९ दशलक्ष टन राहणार अाहे. चीनने मे-अाॅगस्टमध्ये शिल्लक साठ्यातील २ दशलक्ष टन कापसाची विक्री केली अाहे. चीनमधील कापूस विक्रीचा जागतिक स्तरावरील कापसाच्या किमतीवर परिणाम होतो. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस अायात केली जाते. जगातील एकूण साठ्यापैकी अर्धा कापूस साठा चीनमध्ये करून ठेवला जातो, असे कापूस सल्लागार समितीने नमूद केले अाहे.  भारतात लागवड वाढली भारतात यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्रात मागील वर्षापेक्षा १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात गुरुवार (ता. ७)पर्यंत १२.१ दशलक्ष हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. देशात सरासरी कापूस लागवडीचे क्षेत्र ११.३१ दशलक्ष हेक्टर आहे. देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्रात यंदा १०.६ टक्के जास्त लागवड झाली आहे. ४.२ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या कापूस उत्पादक गुजरातमध्येही १०.५ टक्के जास्त लागवड झाली. या राज्यात कापसाखालील क्षेत्र २.६ दशलक्ष हक्टरवर गेले आहे; तर तिसऱ्या क्रमांकाच्या तेलंगणात १.८६ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली. यंदा सरकारने ३५.५० दशलक्ष गाठी (एक गाठ १७० किलो) उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी ३२.५८ दशलक्ष गाठी उत्पादनाचे उद्दिष्ट होते. त्यात यंदा सरकारने वाढ केली आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली. जगातील २०१७-१८ कापूस उत्पादन अंदाज (दशलक्ष टनांमध्ये) उत्पादन----२५.१४ वापर---------२५.१२ निर्यात-------७.८८ अायात--------७.८८ शिल्लक साठा-------१८.५६ स्राेत ः अांतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com