कापूस खरेदीला खानदेशात प्रारंभ
कापूस खरेदीला खानदेशात प्रारंभ

कापूस खरेदीला खानदेशात प्रारंभ

जळगाव : खानदेशात कापूस खरेदीस प्रारंभ झाला आहे. ्वेढोदे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे मूहुर्त खरेदी म्हणून कापसाला ११ हजार ११ रुपये तर नेर (ता. धुळे) येथे पाच हजार ५५५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. खानदेशात एप्रिल व मे महिन्यांमध्ये लागवड केलेल्या पूर्वहंगामी कापसाची वेचणी सुरू झाली आहे.  धुळे आणि जळगावात एप्रिलपासून पूर्वहंगामी कापूस लागवड होते. चोपडा तालुका व धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबा परिसरात कृत्रिम जलसाठ्यांची स्थिती बरी असल्याने या भागातील पूर्वहंगामी कापसाची स्थितीही बरी आहे. त्याची वेचणी मागील महिन्यातच झाली. मोठ्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस विकला.  वेढोदे येथे शेतकरी वासुदेव केसरलाल पाटील यांचा  सुमारे पाच क्विंटल कापूस वेले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील व्यापारी नानाभाऊ पाटील यांनी मुहूर्ताचा कापूस म्हणून ११ हजार १११ रुपये प्रतिक्विंटल या दरात दोन क्विंटल ५१ किलो खरेदी केला. तसेच नेर येथील शेतकरी सुभाष उखर्डू परदेशी यांचा सात क्विंटल कापूस डोंगराळे  (ता. धुळे) येथील व्यापारी लक्ष्मण बाविस्कर यांनी  सोमवारी (ता. ४) पाच हजार ५५५ रुपये प्रतिक्विंटल दरात खरेदी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com