यंदा पीकविमा उतरविण्यात मराठवाड्याची आघाडी

मराठवाड्यात यंदा पावसाच्या खंडामुळे झालेले पीक नुकसान
मराठवाड्यात यंदा पावसाच्या खंडामुळे झालेले पीक नुकसान

औरंगाबाद : खरिपातील पावसाचा मोठा खंड आणि पीक नुकसानीच्या शक्यते नंतर यंदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी खरिपाचा पीकविमा उतरविण्यात आघाडी घेतली. राज्याच्या एकूण टक्केवारीच्या तुलनेत एकट्या मराठवाड्यातून ८६ टक्के पीकविमा अर्ज भरण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील आठही जिल्हे खरिपाचा पीकविमा उतरविण्यात राज्यात आघाडीवर आहे. यामध्ये बीड सर्वात वरच्या स्थानी आहे. गेल्यावर्षी पीकविमा योजनेत देशपातळीवर गौरव झालेला जालना जिल्हा यंदा तिसऱ्या स्थानी असून नांदेड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यात यंदा ६२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकाचा विमा उतरविला. त्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील तब्बल ५३ लाख ७० हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. निसर्गाच्या लहरीपणामुळे कोरडवाहू शेती बेभरवशाची होऊन बसली आहे.केवळ उत्पादन खर्च आपल्या हाती असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सातत्याने फटका बसतो आहे.

चार वर्षे दुष्काळाची गेल्यानंतर २०१६-१७ मध्ये बऱ्यापैकी उत्पादन झाले तर शेतीमालाच्या पडलेल्या दराने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सुरवात केल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची कामे जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच उरकली.

मात्र मराठवाड्यात पुन्हा पावसाने जवळपास दीड ते दोन महिन्यांचा खंड दिला. त्यामुळे पिकाची पूर्णत: वाट लागली. उडीद, मूग, सोयाबीनची बहूतांश पिकं संपून गेली. जास्त कालावधीच्या कपाशीलाही जवळपास पन्नास टक्‍क्‍यांचा फटाका बसला. हे सर्व घडत असतानाच मिळालेल्या मुदतीत व वाढीव मुदतीतही मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिपाच्या पिकांचा विमा उतरविण्यात कुचराई केली नाही.

सातत्याने दुष्काळाचे मळभ दाटत असल्याने सावध झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना संरक्षण मिळावे म्हणून हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.

बीडची आघाडी, नांदेड दुसऱ्या क्रमांकावर मराठवाड्यातील बीड जिल्ह्याने राज्यात  पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत विमा उतरविण्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दुसरा क्रमांक नांदेड तर तिसरा क्रमांक मागच्या वर्षी देशापातळीवर गौरव झालेल्या जालना जिल्ह्याचा आहे. तसेच चौथा क्रमांक लातूरचा, पाचवा क्रमांक परभणीचा, सहावा क्रमांक उस्मानाबादचा, सातवा क्रमांक औरंगाबादचा आणि आठवा क्रमांकांवर हिंगोली जिल्हा आहे.  

जिल्हा सहभागी शेतकरी  टक्‍केवारी राज्यातील क्रमांक
बीड  ११८०१३४ १८१.०६  
नांदेड  ९६०९१९  १६५.०५ 
जालना ८०१८२९ १९५.४१  
लातूर ७५२७५०  १९४.०५
परभणी  ५९२०२६ १७०.१६
उस्मानाबाद ३७१०८७ १०४.०७
औरंगाबाद ४८८०५४ ९१.७७
हिंगोली २२३३१२  १०४.७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com