agriculture news in marathi, agrowon, croploan distribution status in solapur | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात खरिपासाठी ४१ टक्के कर्जवाटप
सुदर्शन सुतार
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गेल्या वर्षी एक हजार १२ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यंदा मात्र ६५१ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत केवळ ४०.९७ टक्के एवढेच कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामासाठी कर्जवाटपाची मुदत सप्टेंबरअखेर आहे. तोपर्यंत ५० टक्के तरी कर्जपुरवठा होईल का, याबाबत साशंकता आहे.

सोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गेल्या वर्षी एक हजार १२ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यंदा मात्र ६५१ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत केवळ ४०.९७ टक्के एवढेच कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामासाठी कर्जवाटपाची मुदत सप्टेंबरअखेर आहे. तोपर्यंत ५० टक्के तरी कर्जपुरवठा होईल का, याबाबत साशंकता आहे.

यंदा खरीप हंगामात ४७ हजार ७०८ शेतकऱ्यांना ६५१ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा बॅंकेने १२६ कोटी, ग्रामीण बॅंकेने ९६ कोटी, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांनी ५०९ कोटी रुपयांचे पीककर्जवाटप केले आहे. या कर्जवाटपात जुन्याच खातेदारांना कर्जवाटप झालेले आहे. नवीन सभासदांना पीककर्ज देण्यात सर्वच बॅंकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.

या हंगामासाठी जिल्ह्यातून केवळ ९४ नवीन शेतकरी सभासदांना ७ कोटी ६२ लाखांचे कर्जवाटप झाले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकेकडील ५२ आणि ग्रामीण बॅंकेकडील ४२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेकडून मात्र एकाही नव्या शेतकरी सभासदाला कर्जवाटप करण्यात आलेले नाही. त्यातच आता सप्टेंबरअखेर खरिपाच्या कर्जवाटपासाठी मुदत आहे, अवघ्या पंधरवड्यात कर्जवाटप किती होणार, याबाबत साशंकता आहे.

राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना या हंगामासाठी तातडीच्या कर्जाकरिता १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण या निर्णयानुसार जिल्ह्यातील केवळ ७५१ शेतकऱ्यांना १० हजारांचे कर्ज मिळाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...