agriculture news in Marathi, agrowon, The crushing of the state will be 950 lakh tonnes | Agrowon

राज्याचे गाळप ९५० लाख टनांपर्यंत जाणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी उसाचे गाळप वेगाने पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. भरमसाठ ऊस उपलब्ध झाल्यामुळे यंदा एकूण गाळप साडेनऊशे लाख टनाच्या आसपास राहील, असा नवा अंदाज साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.  

साखर आयुक्तालयाकडे उसाची उपलब्धता निश्चित करणारी स्वतःची कोणतीही यंत्रणा नाही. साखर कारखान्यांकडून लागवडीची मिळणारी माहितीदेखील बेभरवशाची असते. त्यामुळे सरकारकडून कृषी विभागाच्या आकडेवारीनुसारच राज्यातील उसाची उपलब्धता निश्चित केली जाते. 

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी उसाचे गाळप वेगाने पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. भरमसाठ ऊस उपलब्ध झाल्यामुळे यंदा एकूण गाळप साडेनऊशे लाख टनाच्या आसपास राहील, असा नवा अंदाज साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.  

साखर आयुक्तालयाकडे उसाची उपलब्धता निश्चित करणारी स्वतःची कोणतीही यंत्रणा नाही. साखर कारखान्यांकडून लागवडीची मिळणारी माहितीदेखील बेभरवशाची असते. त्यामुळे सरकारकडून कृषी विभागाच्या आकडेवारीनुसारच राज्यातील उसाची उपलब्धता निश्चित केली जाते. 

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा राज्यात ६५० लाख टन ऊस उपलब्ध राहण्याची शक्यता सांगितली गेली. त्यानंतर आकडेवारीत पुन्हा सुधारणा करून ७५० लाख टनाच्यावर ऊस असल्याचे सांगितले गेले होते. गेल्या महिन्यात गाळप सातशे लाख टनाच्या पुढे गेल्यामुळे सुधारित आकडाही चुकीचा निघाला. 

“राज्यातील सर्व साखर कारखान्यांकडून आम्ही माहिती मागवली असता उसाची उपलब्धता ९५० लाख टनाच्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा १८७ साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत केवळ ४२ कारखाने बंद झालेले आहेत. जादा उसामुळे यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ८० टक्के कारखाने सुरू राहतील. काही कारखाने मेपर्यंत चालणार असल्यामुळे यंदा विक्रमी गाळप होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उसाची भरपूर उपलब्धता असल्यामुळे राज्यातील कारखान्यांनी आतापर्यंत ९७ लाख ३७ हजार टन साखर तयार केली आहे. उतारा ११.१२ टक्के मिळत असून मेपर्यंत एकूण साखर उत्पादन १०६ लाख टनाच्या आसपास जाईल. त्यामुळे बाजारपेठेत भरपूर साखर उपलब्ध राहील. परिणाम भावदेखील दबावाखाली असतील, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. अजून किमान ७५ लाख टन ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. कारखान्यांकडून होत असलेल्या तोडी आणि गाळपाचे एकूण नियोजन बघता तोडी अभावी कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस जळणार नाही, असा दावा सहकार विभागाकडून केला जात आहे. 

इतर अॅग्रो विशेष
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...