दुग्ध प्रक्रिया क्षमता वाढीसाठी १०८८१ कोटीं

दुध
दुध

नवी दिल्ली ः देशभरात दुग्ध प्रक्रियेच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रक्रिया व साठवणीची समस्या या उद्योगापुढे आहे. त्यामुळे दुग्ध प्रक्रिया अाणि पायाभूूत सुविधा बळकट करुन प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १०८.८१ अब्ज रुपयांच्या दुग्ध प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधीला मान्यता दिली आहे.  दुग्ध प्रक्रिया अाणि पायाभूूत सुविधा उभारण्यासाठी २०१७-१८ ते २०२८-२९ या कालावधीसाठी १०८.८१ अब्ज रुपये निधी उभारण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अार्थिक व्यवहार समितीने नुकतीच मंजुरी दिली अाहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.  मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या या निधीतून दूध शीतकरण आणि दुधातील भेसळ चाचणीसाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची साधने उभारून देशात दुधाची कार्यक्षम खरेदी यंत्रणेचे जाळे उभारण्यात येणार आहे.  खरेदी यंत्रणा बळकट करण्याबरोबरच दुग्ध प्रक्रिया सुविधा निर्माण करणे आणि मूल्यवर्धित दुग्ध पदार्थांच्या उत्पादनांसाठीही सुविधा निर्माण करण्यात येणार अाहेत. निधी उभारण्यासाठी राष्ट्रीय कृषी अाणि ग्रामीण विकास बॅंकेकडून (नाबार्ड) राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ आणि राष्ट्रीय डेअरी विकास सहकारी संस्थेला ८०.०४ अब्ज रुपये कर्ज मिळणार अाहे. तर उर्वरित २०.०१ अब्ज रुपये शेवटचे कर्जदार असलेले दूध संघ, राज्य डेअरी फेडरेशन, मल्टिस्टेट दूध सहकारी संस्था, डेअरी कंपन्या अाणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या उपकंपन्यांकडून मिळतील, असे सूत्रांनी सांगितले.  या निधीमधील १२० दशलक्ष रुपये राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ अाणि राष्ट्रीय दूध विकास सहकारी संस्था मिळून उपलब्ध करणार अाहेत. पशुसंर्वधन, डेअरी अाणि मत्स्योद्योग विभागाचा वाटा ८.६४ अब्ज रुपये निधी देणार आहे.  असा उभा करणार निधी

  • नाबार्ड ः ८०.०४ अब्ज रुपये
  • दूध संघ, राज्य डेअरी फेडरेशन, मल्टिस्टेट दूध सहकारी संस्था, डेअरी कंपन्या अाणि राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या उपकंपन्या ः २०.०१ अब्ज रुपये
  • राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ अाणि राष्ट्रीय दूध विकास सहकारी संस्था ः १२० दशलक्ष रुपये
  • पशुसंर्वधन अाणि डेअरी अाणि मत्स्योद्योग विभाग ः ८.६४ अब्ज रुपये
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com