agriculture news in Marathi, agrowon, The dam at 33.86 percent in the state | Agrowon

राज्यातील धरणसाठा ३३.८६ टक्क्यांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे  : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. सोमवारपर्यंत (ता.२३) राज्यातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ३ हजार २४६ प्रकल्पांमध्ये ४८४.७७ टीएमसी (३३.८६ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. गेली काही वर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगली स्थिती आहे. मात्र, विदर्भातील पाणीसाठा मात्र चिंताजनक आहे. तर काेकण, पुणे विभागात पुरेसा पाणीसाठा असून, नाशिक विभागातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. 

पुणे  : तापमान वाढताच राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. सोमवारपर्यंत (ता.२३) राज्यातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ३ हजार २४६ प्रकल्पांमध्ये ४८४.७७ टीएमसी (३३.८६ टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. गेली काही वर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगली स्थिती आहे. मात्र, विदर्भातील पाणीसाठा मात्र चिंताजनक आहे. तर काेकण, पुणे विभागात पुरेसा पाणीसाठा असून, नाशिक विभागातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. 

मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा
मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा आहे. सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पामध्ये अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून ६०.८३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, माजलगाव, मांजरासह अनेक धरणांमध्ये पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. येलदरी, सिद्धेश्‍वर प्रकल्पांतील पाणीसाठा अचल पातळीत आहे. मराठवाड्यातील ४४ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५२.८२ टीएमसी (३३.२३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर ८१ मध्यम प्रकल्पांमध्ये ११.४० टीएमसी (३०.५५ टक्के) आणि ८३२ लहान प्रकल्पांमध्ये १६.५९ टीएमसी (२६.३५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. 

पुणे विभागात पुरेसा पाणीसाठा
पुणे विभागातील उजनी, कोयनेसह अनेक धरणांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. अचल आणि उपयुक्त पाणीसाठा मिळून उजनी धरणात ७५.५९ टीएमसी, तर कोयनेत ५५.२५ टीएसमी पाणीसाठा शिल्लक होता. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणात पाणीसाठा २० ते ४० टक्क्यांवर आहे. कोल्हापुरातील तुहशी, काळम्मावाडी, राधानगरी धरणात ४० टक्क्यांपेक्षा अधिक, तर सांगलीतील वारणा, साताऱ्यातील उरमोडी, धोम धरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये १७४.३३ टीएमसी (३९.३३ टक्के), ५० मध्यम प्रकल्पांमध्ये १९.४९ टीएमसी (४०.४९ टक्के) आणि ६४० लहान प्रकल्पांमध्ये १५.२५ टीएमसी (३०.८२ टक्के) पाणी आहे.

नाशिक विभागातील पाणीसाठ्यात घट
नाशिक विभागातील भंडारदारा, ऊर्ध्व तापी हातनूर, वाघूर, अर्जुनसागर, गंगापूर, चणकापूर, दारणा, वैतरणा या धरणांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. उर्वरित धरणांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. नाशिक विभागातील सर्व धरणांमध्ये मिळून ७४.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यात मोठ्या २३ प्रकल्पांमध्ये ४८.८२ टीएमसी (३७.६९ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १३.९१ टीएमसी (३३.०९ टक्के) आणि लहान ४८५ प्रकल्पांमध्ये १२ टीएमसी (३१.९८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. 

कोकणात ६२.७० टीएमसी पाणी 
कोकणातील धरणांमध्ये एप्रिल महिन्यात जवळपास गतवर्षी इतकाच पाणीसाठा आहे. १७५ प्रकल्पांमध्ये यंदा ६२.७० टीएमसी (५०.७१ टक्के) पाणी शिल्लक असून, गतवर्षी या प्रकल्पामध्ये याच तारखेला सुमारे ४९ टक्के पाणी होते. कोकणातील भातसा, मध्य वैतरणा, सूर्या धामणी, सूर्या कवडास, तिल्लारी प्रकल्पांसह ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून ४३.५७ टीएमसी (५०.१६ टक्के), ७ मध्यम प्रकल्पामध्ये ९.१० टीएमसी (५३.०२ टक्के) तर १५७ लघुप्रकल्पात १०.०२ टीएमसी (५१.१३) पाणीसाठा झाल्याचे सिंचन विभागातर्फे सांगण्यात आले. 

अमरावती विभागात १९ टक्के पाणीसाठा
गतवर्षी विदर्भात पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नव्हता. त्यामुळे विदर्भातील पूर्व भागात नागपूर आणि पश्‍चिम भागातील अमरावती विभागात यंदा सर्वांत कमी पाणीसाठा आहे. सोमवारपर्यंत (ता. २३) अमरावतीमध्ये १९.३५ टक्के तर नागपूर विभागात १७.४४ टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये १३.८७ टीएमसी (१५.८३ टक्के), २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ६.६७ टीएमसी (२८.४९ टक्के), ४०९ लघू प्रकल्पांमध्ये ७.९८ टीएमसी (२१.९२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पात २१.१८ टीएमसी (१६.८६ टक्के), मध्यम ४२ प्रकल्पांमध्ये ४.६६ टीएमसी (२०.८१ टक्के), ३२६ लघू प्रकल्पांमध्ये मिळून ३.११ टीएमसी (१७.३१ टक्के) पाणी असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील लहान, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमधील 
२३ एप्रिलपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

विभाग प्रकल्पांची 
संख्या
एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती ४४३ १४७.४७ २८.५३ १९.३५
कोकण १७५ १२३.६७ ६२.७० ५०.७१
नाशिक ३८५ २०९.१४ २०९.०७ ३८.९०
पुणे ५६१ ५३७.४४ ८०.७८ ३१.१७
मराठवाडा ९५७ २५९.१४ ८०.७८ ३१.१७
एकूण ३२४६ १४४२.८६ ४८४.७७ ३३.८६

 

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...