जळगाव जिल्ह्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017
आमच्या तुरीमध्ये यंदा मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. तूर बहरण्याची आता वेळ आहे, परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे तिच्या वाढीवरही परिणाम दिसून येत आहे. 
- जालिंदर पाटील, तूर उत्पादक, वायला टाकळी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव.
जळगाव  ः जिल्ह्यात पूर्वहंगामी (बागायती) व कोरडवाहू तुरीवर मर रोगाचा काहीसा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात पीक हळूहळू पिवळे होऊन पुरते जमीनदोस्त होत आहे. मर रोगामुळे काळ्या कसदार जमिनीसह हलक्‍या व मुरमाड जमिनीतील पीक बाधित होत आहे. यात अनेक ठिकाणी नुकसानाची पातळी हजार झाडांमागे ६० ते ७० झाडे एवढी आढळून आली आहे. 
 
जिल्ह्यात यंदा तुरीची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. त्यात सर्वाधिक लागवड मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, जामनेर व पाचोरा तालुक्‍यांत आहे. चोपडा, जळगाव, अमळनेरमधील तापी काठावरील अनेक गावांमध्येही बऱ्यापैकी लागवड झाली आहे.
 
जिल्हाभरात जवळपास अडीच हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती तूर आहे. पूर्वहंगामी तूर सद्यःस्थितीला फुलोऱ्यावर आली आहे. यातच पूर्वहंगामी तुरीमध्येच मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव कसा रोखावा, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे  वातावरण आहे. मरग्रस्त झाडे पिवळी होऊन नंतर पूर्णतः वाळतात. ही झाडे उपटून फेकण्याशिवाय कोणताही पर्याय शेतकऱ्यांसमोर नसल्याची स्थिती आहे. यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकरी एक क्विंटलपर्यंतचे नुकसान आजच सहन करण्याची वेळ मर रोगामुळे आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...