नगर जिल्ह्यात कर्जवसुली सुरू, मात्र सक्ती नाही

कर्जवसुली सुरू, मात्र वसुलीची सक्ती नाही
कर्जवसुली सुरू, मात्र वसुलीची सक्ती नाही

नगर  ः नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची कर्ज वसुली सुरू आहे. सक्तीने वसुली करू नये, असा शासनाचा कोणताही आदेश नाही. मात्र, जिल्हा बॅंकेकडून कर्जवसुलीबाबत सक्ती केली जात नाही. कर्जमाफी आणि बाबीचा कर्जवसुलीवर परिणाम झाला आहे. याआधी ८० ते ८५ टक्के वसुली होत होती. मात्र, यंदा वसुलीत निम्म्याने घट झाल्याचे जिल्हा बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले. 

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कर्जवसुलीवेळी दोन दिवसांपूर्वी पडसाद उमटले. त्यामुळे राज्यातील अन्य बॅंका सावध भूमिका घेत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका शेती उत्पन्नावर अवलंबून आहेत. आशिया खंडात सर्वांत मोठी सहकारी बॅंक अशी ओळख असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची ओळख आहे.

बॅंकेने सध्या सुरू असलेल्या कर्ज वसुलीबाबत स्पष्टीकरण दिले. जिल्ह्यामधील १६०० गावांत बॅंकेचे एकून ९ लाख १९ हजार ८३८ एकून खातेदार असल्याची बॅंकेकडे नोंद असून, सात लाख ७५ हजार ४९४ सभासद आहेत. बॅंकेने गेल्या वर्षभरात २ लाख ४० हजार ४१४ सभासदांना एक हजार ५१ कोटी सहा लाखांचे कर्ज वाटप केले आहे. त्यातील ६१२ कोटी १९ लाख रुपये वसुल झाले आहेत. 

शेतकरी सतत अडचणीत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चांगल्या प्रकारे शेतीची स्थिती असली तरी अजून बऱ्याच तालुक्‍यात शेतकरी संकटात आहे. कर्जवसुली करताना ती सक्तीने करू नये असे शासनाचे कोणतेही आदेश नाहीत. मात्र, शेतकऱ्याची अडचण पाहता बॅंकेची नियमित वसुली सुरू असली तरी कोणत्याही कर्जदाराला वसुलीबाबत सक्ती केली जात नाही.

शासनाने पूर्वी १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत थकीत कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले. त्यानुसार आतापर्यंत २ लाख ५ हजार ९३६ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला. त्यापोटी ५२० कोटी जमा झाले. मात्र पुन्हा १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीची माहिती मागितली आहे. शिवाय ३० जून २०१७ पर्यत थकीत कर्जदाराला कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत विचार करू असे शासनाने सांगितले. त्याबाबत अजून कसलेही परिपत्रक नाही. मात्र, या बाबीचा कर्जवसुलीवर परिणाम झाला आहे. सध्या अनेक सोसायट्या अडचणीत आहेत. असे असेल तरी कर्जवसुलीबाबत सक्ती नाही, असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com