‘डेक्कन’चे एकरी २०० टनाचे उद्दिष्ट

राज्यातील ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यभर डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने (डीएसटीए) आणि ऊस संजीवनी ग्रुपचे प्रयोग सुरू केले आहेत. सांगलीच्या इस्लामपूर भागातील एका प्रयोगाचे छायाचित्र.
राज्यातील ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यभर डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने (डीएसटीए) आणि ऊस संजीवनी ग्रुपचे प्रयोग सुरू केले आहेत. सांगलीच्या इस्लामपूर भागातील एका प्रयोगाचे छायाचित्र.

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापुढे एकरी २०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवत मार्गदर्शन करण्याचा महत्त्‍वपूर्ण निर्णय डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने (डीएसटीए) घेतला आहे.

डीएसटीएचे कार्यकारी सचिव एस. बी. देव यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून डीएसटीएचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात आम्ही १०० टन उत्पादकतेचे उद्दिष्ट ठेवले होते. आता मात्र, त्यात बदल करण्यात आला असून यापुढे २०० टनांचे उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

सांगलीच्या इस्लामपूर भागात एकरी २०० टन उसाचे उत्पादन घेतले जात आहे. या प्लॉटला असोसिएशनच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी नुकतीच भेट दिली. डीएसटीएचे अध्यक्ष मानसिंगराव जाधव, उपाध्यक्ष बी. डी. पवार, माजी कुलगुरू डॉ. वाय.एस. नेरकर, ऊस शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. पवार, डॉ.सुभाष शिंदे, म.व्ही. बोखारे, विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी संजीवनी ग्रुपच्या प्रयोगांची पाहणी केली.

ऊस संजीवनी ग्रुपने पाणी, जमीन, निविष्ठा याचा प्रभावी वापर करीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संजीव माने यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक खोत यांच्या शेतावर २०० टनांचा प्रयोग घेण्यात आलेला आहे. १०० दिवसांचे पीक प्रत्यक्ष पाहणीत अतिशय तजेलदार, उंची आणि फुटव्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.

''को ८६०३२ वाणाची एकडोळा पद्धतीने पाच फूट सरीत सव्वा फूट अंतरावर लागण केलेली आहे. माती परीक्षण करून जीवाणू खते, वाढ नियंत्रक, ठिबकचा वापर करण्यात आलेला आहे. प्लॉटमध्ये योग्य तापमान आणि आर्द्रता राहण्यासाठी फॉगर्स बसविण्यात आलेले आहेत. या प्रयोगामुळे राज्यात उसाची उत्पादकता वेगाने वाढू शकते, असे डीएसटीएचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com