agriculture news in Marathi, agrowon, Decide to take action on FRP pending factories | Agrowon

एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाईबाबत निर्णय घ्या
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018

कोल्हापूर  : एफआरपी मुदतीत न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईबाबत येत्या दोन आठवड्यांत योग्य निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत आंदोलन अंकुश या संघटनेने ८ मार्च २०१८ ला न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसारच न्यायालयाने हा आदेश दिल्याचे श्री. चुडमुंगे यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूर  : एफआरपी मुदतीत न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईबाबत येत्या दोन आठवड्यांत योग्य निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत आंदोलन अंकुश या संघटनेने ८ मार्च २०१८ ला न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसारच न्यायालयाने हा आदेश दिल्याचे श्री. चुडमुंगे यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ‘‘शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ नुसार साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना घातलेल्या अटी नुसार, ऊस काढणीनंतर १४ दिवसांत शेतकऱ्याला एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र १५ डिसेंबर पासून तुटलेल्या उसाची बिले कारखान्यांनी संगनमत करून थकवली आहेत. तसेच परस्पर बैठक घेऊन एफआरपी केवळ २५०० रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला. त्यानुसार शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली. मात्र शेतकऱ्याची ही फसवणूक असल्याचा आरोप करीत साखर कारखानदारांविरोधात आंदोलन अंकुश या संघटनेच्या वतीने साखर सहसंचालक, आणि साखर आयुक्त, पुणे यांच्याकडे दाद मागण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी देखील न्याय मिळत नसल्याने अखेर ८ मार्च २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयात आंदोलन अंकुश या संघटनेच्या वतीने पुनरयाचिका दाखल करण्यात आली होती. 

त्यानुसार न्यायालयाने याचिकाकर्ते यांचे म्हणणे एकूण घेत साखर आयुक्त पुणे यांनी, एफआरपी न देणाऱ्या साखर कारखांन्यावर कारवाईबाबत येत्या दोन आठवड्यांत योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्यास, यापुढे न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देखील त्यांनी या वेळी दिला. या वेळी, विकास सश्वरे, रघुनाथ पाटील, प्रभाकर बंडगर, मनोज राजगिरे, आशाराणी माने आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...